आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निकालांवरुन सोशल मीडियावर कलगीतुरा:4 राज्यांत भाजपची सत्ता आल्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार म्हणाले- महाराष्ट्र लढने को तैयार है; नेटकऱ्यांनी दिल्या भन्नाट प्रतिक्रिया

7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर आणि गोवा या चार राज्यांच्या निकालात भाजपने बाजी मारल्यानंतर आता पुढील महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काय होणार, याची सामान्यांमध्ये आतापासूनच उत्सुकता निर्माण झाली आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपने गोव्यात यश मिळवले. मात्र, राज्यात सत्तेत असलेल्या शिवसेनेच्या उमेदवारांचे गोव्यात डिपॉझिटही जप्त झाले. त्यानंतर महाराष्ट्रातही पुढील निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांची जादू चालणार, असा दावा भाजप नेत्यांकडून केला जात आहे. त्याला महाविकास आघाडीतील नेते-कार्यकर्त्यांकडूनही जोरदार प्रत्युत्तर दिले जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनीही 'महाराष्ट्र अभी बाकी है' या भाजपच्या घोषणेला त्याच भाषेत 'तो महाराष्ट्र भी तैयार है', असे प्रत्युत्तर दिले आहे. याबाबत त्यांनी ट्वीट केले आहे.

अमोल मिटकरी यांच्या ट्वीटला नेटकऱ्यांकडूनही जोरदार प्रतिसाद मिळत आहे. मोजकेच जण त्यांना पाठिंबा देत आहे. तर बहुतांश नेटकरी महाविकास आघाडीतील नेत्यांवर बेरोजगारी, एसटी कर्मचाऱ्यांचा संप यावरुन टीका करत याबाबत सरकारने ठोस काम न केल्यास सत्ता जाऊ शकते, असा इशारा दिला आहे. पाहूया सोशल मीडियावरील या प्रतिक्रिया...

बातम्या आणखी आहेत...