आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोठी बातमी!:आता पहिलीपासून पुढील सर्व वर्ग सुरु करण्याचा सरकारकडून विचार, राज्यात कोरोना संसर्ग नियंत्रणात असल्याने निर्णयाची शक्यता

12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात कोरोनाच्या संसर्गामुळे सध्या बंद असलेल्या पहिले ते चौथी पर्यंतचे 10 ते 15 दिवसांमध्ये सुरु होण्याची शक्यता आहे. मिडिया रिपोर्टनुसार, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या बैठकीत सर्व शाळा सुरू करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. यावेळी शालेय शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड यांच्यासह संबंधित विभागांचे सचिव आणि अन्य अधिकारी यावेळी उपस्थित होते.

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव आता कमी झाला आहे. रुग्णसंख्येतही मोठी घट झाल्याचे दिसत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात 8 ते 12 चे वर्ग सुरु झाले करण्यात आले आहेत. त्याचबरोबर महाविद्यालये देखील सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळे आता पुढील टप्प्यात पहिली ते चौथीचे वर्ग सुरू करण्याबाबत सरकारच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...