आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Maharashtra Unlock News And Updates, Unlock Will Be Done In 5 Phases In The State. In The First Phase, Lockdown Has Been Removed In 18 Districts

राज्य सरकारचा यू-टर्न:नव्या नियमांचा प्रस्ताव अजून विचाराधीन, राज्यातील अनलॉकचा निर्णय मागे

मुंबई15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • साप्ताहिक पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन बेडसची उपलब्धता हे निकष ठरवण्यात येत आहेत

कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस घट होत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यातील कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने ब्रेक द चेन अंतर्गत लागू केलेले कठोर निर्बंध आता हटवण्याचा निर्णय घेतला. पण, या निर्णयाच्या काही तासानंतर राज्य सरकारकडून एक निवेदन जारी करण्यात आले आहे. त्यात राज्यातील निर्बंध अद्याप हटवले नसल्याचे म्हटले आहे. तसेच, नव्या नियमांचा प्रस्ताप अजून विचाराधीन असल्याची माहिती देण्यात आली आहे.

राज्याचे मदत आणि पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषद घेत अनलॉकचे पाच टप्पे जाहीर केले. मात्र आता तासाभरातच ठाकरे सरकारने आपल्या निर्णयावरून यू टर्न घेतला आहे. या संदर्भात आता राज्य सरकारने स्पष्टीकरण देत म्हटले की, राज्यातील निर्बंध हटवण्यात आले नाहीत. राज्य सरकारने सांगितले की, कोरोनाचा संसर्ग अजूनही आपण पूर्णपणे थोपविलेला नाही. ग्रामीण भागात काही ठिकाणी अजूनही संसर्ग वाढत आहे. कोरोना विषाणुचे घातक आणि बदलते रूप लक्षात घेऊनच निर्बंध शिथिल करावयाचे किंवा कसे याविषयी निश्चित करावे लागेल.

राज्यातील निर्बंध उठविण्यात आलेले नाहीत. ब्रेक दि चेन मध्ये काही प्रमाणात निर्बंध शिथिल करावयास सुरुवात केली आहे. या पुढे जातांना आपत्ती व्यवस्थापन विभागाकडुन पाच टप्पे ठरविण्यात येत असून यासाठी साप्ताहिक पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन बेडसची उपलब्धता हे निकष ठरवण्यात येत आहेत. राज्यात या निकषांच्या आधारे निर्बंध कडक किंवा शिथिल करण्यासंदर्भात विस्तृत मार्गदर्शक सुचना शासननिर्णयाद्वारे अधिसुचित करण्यात येतील.

अशा रीतीने निकषांचा आधार घेऊन टप्पेनिहाय निर्बंध शिथिल करण्याच्या बाबतीत प्रस्ताव विचाराधीन असून जिल्ह्यांच्या संबंधित प्रशासकीय घटकांकडून पूर्ण आढावा घेऊन अंमलबजावणीचा विचार केला जाईल. स्थानिक प्रशासनाकडून याविषयीची माहिती तपासून घेण्यात येत आहे. त्यानंतरच अधिकृत निर्णय कळवला जाईल. तसेच हा निर्णय कसा लागू केला जाणार आहे ते उपरोक्त शासन निर्णयान्वये स्पष्ट करण्यात येईल, अशी माहिती राज्य सरकारकडून देण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...