आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भुजबळांचे गणरायाला साकडे:बाप्पाने कोरोनासोबत काही लोकांच्या मनातील द्वेषाचे रोगही दूर करावेत, छगन भुजबळांचे बाप्पाला साकडे

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

बाप्पाने कोरोनाच्या रोगासोबतच काहींच्या मनातील द्वेषाचे रोग दूर करावेत, अशी प्रार्थना केली, असं छगन भुजबळ म्हणाले. यावेळी त्यांनी ईडी आणि सीबीआयच्या कारवायांवर देखील भाष्य केले. मुंबईतील अंजिरवाडी गणेशोत्सव मंडळाच्या गणारायची अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते प्रतिष्ठापना झाली. यावेळी छगन भुजबळ यांनी माध्यमांशी संवाद साधला.

गणपती बाप्पाकडे हीच प्रार्थना केली कोरोना दूर करा. त्यानंतर कोरोना दूर झाल्यावर काही लोकांच्या मनामध्ये असलेला द्वेषाचा रोग दूर करा. सगळ्यांना जरा निरोगी करा. शारीरिकदृष्ट्यासुद्धा आणि मानसिकदृष्ट्यासुद्धा, अशी प्रार्थना केली असंही छगन भुजबळ म्हणाले.

भुजबळांची निर्दोष मुक्ततेवर प्रतिक्रिया

महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी न्यायालयाने काल दिलेल्या निर्णयावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. 'गणपतीही आशीर्वाद देतात आणि नियती आशीर्वाद देते ती जनतेच्या माध्यमातूनच देते. नियतीनं आशीर्वाद दिला. त्यामुळं मला न्याय मिळतो आहे. यापुढेही न्याय मिळेल. दोन प्रकरणात न्याय मिळाला. महाराष्ट्र सदन हे मूळ प्रकरण आहे. इतर खटले त्यावरच आधारलेले आहेत. इकडून तिकडून संबंध जोडून ही प्रकरणे तयार केली गेली. न्यायदेवतेलाही ते माहीत झाले. त्यामुळे आम्हाला आनंद आहे,' असं ते म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...