आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नितेश राणेंचा ठाकरे ससकारवर निशाणा:खानच्या मुलाची ठाकरे सरकारला चिंता आहे पण पाटलाच्या मुलाची चिंता नाही, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोडले टीकास्त्र

5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मुद्य्यावरून ठाकरे सरकारवर भाजप आमदार नितेश राणे यांनी जोरदार टीका केली. मराठा समजाने भूमिका घ्यावी, 58 मोर्चे तुम्ही काढले असतील तर 59 वा मोर्चा तुम्ही काढण्याची वेळ आलेली आहे, असे आवाहनही नितेश राणेंनी केले आहे.

दरम्यान, या सरकारला आर्यन खानची चिंता आहे, पण पाटलाच्या मुलाची चिंता नाही. देशमुखाच्या मुलीची चिंता नाही. असेही नितेश राणेंनी यावेळी बोलून दाखवले.

सारथी, अण्णासाहेब आर्थिक विकास मंडळ या संस्थांचा कणा मोडणारे काम ठाकरे सरकारने केले आहे. मराठा तरुणांचे वय वाढत असताना मराठा आरक्षणावर कोणत्याही प्रकारचा तोडगा या दोन वर्षात काढलेला नाही, यावर राज्यसरकारने उत्तर दिलेच पाहिजे, अशी प्रतिक्रीया राणे यांनी दिली.

अरबी समुद्रातील शिवस्मारकासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दोन वर्षांत एक तरी बैठक घेतली असेल तर त्याचा फोटो दाखवावा. यासाठी मराठा क्रांती मोर्चाचा काळ परत आणावा लागेल, या सरकारला झुकवले नाही तर, हे गेंड्याच्या कातडीचे लोक असल्याची टीकाही राणेंनी केली.

बातम्या आणखी आहेत...