आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोग्य विभागाच्या परीक्षेचा पुन्हा गोंधळ!:राजेश टोपे यांची तत्काळ आरोग्यमंत्री पदावरून हकालपट्टी करा; आरोग्य विभागाच्या परीक्षेच्या गोंधळानंतर अतुल भातखळकरांची मागणी

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात आरोग्य विभागाच्या परीक्षेवरुन पुन्हा गोंधळ उडाला आहे. परीक्षेत झालेल्या गोंधळाची ही दुसरी वेळ असल्याने विरोधक आक्रमक झाले आहेत. भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी थेट आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

ट्विटद्वारे व्हिडिओ शेअर करत त्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. तसेच ‘टोपे साहेब आता विद्यार्थ्यांसाठी हेलिकॉप्टरची व्यवस्था कराच’ असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

अतुल भातखळकर म्हणाले की, "सप्टेंबर महिन्यात आरोग्य विभागातील नोकर भरतीच्या वेळी जो गोंधळ राजेश टोपे यांनी घातला तोच गोंधळ आता पुढच्या रविवारी होणाऱ्या परीक्षेच्या बाबतीत आहे. एकाच दिवशी दोन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची सेंटर्स 100 किमीच्या अंतरावर आहेत. टोपे साहेब आता या सर्व विद्यार्थ्यांना हेलिकॉप्टरची सोय करुन द्या. कारण पुण्याचा मनुष्य वाशिमला कसा जाणार आणि वाशिमला परीक्षा दिलेला पुन्हा पुण्याला कसा जाणार? सगळा भ्रष्टाचार. सगळा गोंधळ.

बातम्या आणखी आहेत...