आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भीषण संकट, शेतकरी चिंतेत:त्यांच्या पाठीशी उभे राहण्याची गरज, तुमच्या राजकारणात शेतकऱ्यांचा बळी नको! - देवेंद्र फडणवीस

18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाशिम, हिंगोली आणि नांदेड दौऱ्यासाठी देवेंद्र फडणवीस आज मराठवाडा दौऱ्यावर आहेत. केंद्र सरकारकडे बोट दाखवून प्रश्न सुटणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. तुमचे राजकारण जरूर होईल, पण शेतकऱ्यांचा बळी जाऊ देऊ नका. या दौऱ्यानंतर मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही भेटणार आहे. शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या मदतीसाठी सत्ताधारी बोट दाखवत आहेत. पण आता शेतकऱ्यांच्या पाठीशी उभ राहण्याची गरज आहे, असेही त्यांनी फडणवीस म्हणाले.

'विमाकंपन्या केवळ कागदीघोडे नाचवितात'

यावेळी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना माजी मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाब विचारला. शेतकऱ्यांनी विमा काढला आहे. त्यांचे नुकसान झाल्यानंतर त्यांना विमा मिळालाच पाहिजे. विमा कंपन्या केवळ कागदीघोडे नाचविते आहेत. शेतकऱ्यांनी विमा भरल्यानंतर त्यांना विमा मिळालाच पाहिजे. शेतकऱ्यांना विमा नाकारणाऱ्या विमा कंपन्यावर कारवाई का करीत नाहीत, असा सवाल त्यांनी केला.

देवेंद्र फडणवीस वाशिम जिल्ह्यातील शिवणी रोड तसेच पिंप्री येथे नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांच्या नुकसानाची व्यथा ऐकून घेण्यासाठी ते शेतकऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेले पहायला मिळाले.

बातम्या आणखी आहेत...