आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फडणवीसांचे पवारांना प्रत्युत्तर:मी सलग 5 वर्षे मुख्यमंत्री होतो; पवार साहेब मोठे नेते आहेत, पण कधीच सलग 5 वर्षे मुख्यमंत्री राहू शकले नाहीत

5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी फडणवीसांनी केलेल्या 'अजूनही मुख्यमंत्री असल्यासारखे वाटते' या वक्तव्यावरुन जोरदार टोला लगावला आहे. तर पवारांच्या या टोल्याला देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

फडणवीस म्हणाले, मी सलग पाच वर्षे मुख्यमंत्री राहिलो. चाळीस वर्षांनंतर मी सलग पाच वर्षे मुख्यमंत्री राहिलो. पवारसाहेबही मोठे नेते आहेत ते चार वेळा मुख्यमंत्री राहिले पण ते सगळे पाच वर्षे कधीच राहू शकले नाहीत. राहिले असते तर बरे झाले असते, त्यांनी चांगलेच काम केले असते. पण त्यावेळच्या परिस्थितीमुळे त्यांना कधी दोन वर्षे, कधी दीड वर्षे मुख्यमंत्रीपदावर राहता आले.

महाविकास आघाडी अस्वस्थ -
मला एका गोष्टीचे यावेळी समाधान आहे की, मी विरोधी पक्षनेता म्हणून देखील समाधानी आहे हे पाहून अख्खी महाविकास आघाडी अस्वस्थ झाली आहे. हीच माझ्या कामाची पावती आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

फडणवीस काय म्हणाले होते?
नवी मुंबईतील एका कार्यक्रमात फडणवीस म्हणाले होते की, मला असे वाटतच नाही की मी मुख्यमंत्री नाही. मला जनतेने कधीच जाणवू दिले नाही की मी मुख्यमंत्री नाही. मी आजही मुख्यमंत्री आहे हेच तुम्ही मला जाणवून दिले आहे, असं फडणवीस म्हणाले. तसेच ज्या दिवशी मला जनतेचा आशीर्वाद मिळेल त्या दिवशी इथे मी देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी पुन्हा येईल. त्यामुळे त्याची काळजी घेऊ नका. मी नक्की येईल. तुमचं निमंत्रण मी आजच स्विकारतो, असंही ते म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...