आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फडणवीस-राज ठाकरे भेट:देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंच्या भेटीला 'शिवतीर्थ'वर, भेटीचे कारण गुलदस्त्यात; राजकीय चर्चांना उधाण

7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी भेट घेतली आहे. राज ठाकरे आणि फडणवीस यांचा गॅलरीतील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. फडणवीस-राज ठाकरे यांच्या भेटीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

दरम्यान, या दोन नेत्यांमध्ये भेट झाली असल्यामुळे युतीच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. परंतु ही भेट कौटुंबीक असल्याचेही सांगितले जात आहे. राज ठाकरे कृष्णकुंजच्या बाजूलाच असलेल्या शिवतीर्थ या घरात वास्तव्यास आहेत.

दिवाळीमध्ये आशिष शेलारांनी घेतली राज ठाकरेंची भेट
दिवाळीमध्ये भाजप नेते आशिष शेलार हे राज ठाकरेंच्या घरी आले होते. राज ठाकरे आणि आशिष शेलार यांच्यातील मैत्रीबद्दल सर्वांनाच माहित आहे. दरवर्षी आशिष शेलार राज ठाकरेंना भेटण्यासाठी कृष्णकुंजवर येत असतात. दिवाळी पाडव्याच्या दिवशी आशिष शेलार सकाळीच कृष्णकुंजवर पोहोचले. जवळपास अर्धा तास दोघांमध्ये भेट झाली होती.

चंद्रकांत पाटील आणि राज ठाकरेंच्या भेटीत...

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भेट घेतली होती. राज ठाकरे यांनी परप्रांतीयांची भूमिका सोडली तर युतीबाबत विचार करु असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले होते. त्यामुळे भाजप-युतीचे संकेत पाटील यांनी दिले होते. राज ठाकरे चंद्रकांत पाटील यांच्या भेटीमध्ये युतीबाबत चर्चा झाली नसल्याचेही चंद्रकांत पाटील यांनी म्हटले होते

बातम्या आणखी आहेत...