आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किरीट सोमय्यांचा आरोप:उपमुख्यमंत्री अजित पवारांची बहिणींच्या नावे बेनामी संपत्ती, जरंडेश्वरमध्ये घोटाळा; पवारांनी भूमिका स्पष्ट करण्याचे आवाहन

4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी भ्रष्टाराचे आरोप केले आहेत. अजित पवारांनी जरंडेश्वर साखर कारखान्याच्या खरेदी आणि विक्रीमध्ये घोटाळा केला आहे. जरंडेश्वरमध्ये अजित पवार आणि त्यांच्या बहिणी मालक, भागधारक आहेत. बहिणींच्या नावे अजित पवारांनी बेनामी संपत्ती जमवली आहे. आयकर विभागाचे छापेमारी त्याच संदर्भात सुरु असून अजित पवारांनीच आता सांगावे की, बहिणींच्या घरी धाडी का टाकण्यात आल्या आहेत. अजित पवारांच्या बहिणीचे पती मोहन पाटील जरंडेश्वर साखर कारखान्याचे संचालक आहेत. पवार कुटुंबीयांच्या अनेक बेनामी मालमत्ता असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.

ठाकरे -पवार सरकार हे घोटाळेबाज सरकार- सोमय्या

राज्यातील ठाकरे -पवार सरकार हे घोटाळेबाज सरकार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्या पत्नीच्या नावे 19 बंगल्यांची संपत्ती उभी करु शकतात तर पवार काहीही करु शकतात, असे सोमय्या यांनी म्हटले आहे.

किरीट सोमय्यांचा मुश्रीफांवर आरोप

किरीट समोय्या यांनी हसन मुश्रीफ यांच्यावरही पुन्हा आरोप केले आहे. मुश्रीफ यांच्या मुलाने बोगस बँक अकाउंट उघडले आणि अकाउंटमधून ज्या कंपन्या बंद झाल्या तिथून कोट्यवधी रुपयांचे व्यवहार झाल्याची माहिती सोमय्या यांनी दिली.

केंद्र सरकारकडून ग्रामविकास विभागाला 1500 कोटी रुपयांचा निधी आला होता. त्याचे कंत्राट नातेवाईकांना दिले गेले अशी तक्रार किरीट सोमय्या यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना केली आहे.

10 वर्षांपूर्वी बंद झालेल्या कंपनीतून कोट्यवधी रुपये मुश्रीफ यांनी लाटले. दिलीप वळसे पाटील यांनी त्यांची हे काळे थांबवावे. आता मी मुश्रीफ यांच्या जावयाविरोधात तक्रार दिली आहे. त्यावर लवकरच कारवाई होईल, असेही सोमय्या म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...