आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निलेश राणेंचा शरद पवारांना टोला:म्हणाले- दोन दिवस उशिरा का होईना पवार साहेबांना वाढदिवसाचे गिफ्ट मिळाले, विधानपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादीला शून्य जागा, पण...

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

विधान परिषदेच्या निवडणुकांचे आज निकाल लागले. यामध्ये नागपूर आणि अकोला या दोन मतदारसंघात निवडणूक घेण्यात आली असून भाजपने दणदणीत विजय मिळवला आहे.

सहापैकी चार जागा बिनविरोध निवडून आल्या होत्या. त्यावरूनच आता भाजप नेते निलेश राणे यांनी ट्विट करून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना टोला लगावला आहे. मात्र, पवारांना टोला लगावण्याच्या नादात राणे यांनी व्यवस्थित अभ्यास केल्याचे दिसत नाही. कारण, सहा विधान परिषदेच्या जागांवर कुठेही राष्ट्रवादीचा उमेदवार दिसला नाही.

निलेश राणे काय म्हणाले -
दोन दिवस उशिरा का होईना पवार साहेबांना वाढदिवसाचे गिफ्ट मिळाले. विधानपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादीला शून्य जागा मिळाल्या, असे ट्विट निलेश राणेंनी केले आहे. तसेच त्यांनी निवडून आलेल्या सर्व भाजप उमेदवारांचे अभिनंदन देखील केले.

बातम्या आणखी आहेत...