आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्य सरकारकडून निर्बंधांचे सुधारित आदेश:वादानंतर अखेर जिम आणि ब्युटीपार्लरवरील निर्बंध मागे, 50 टक्के क्षमतेने सुरू करण्यास परवानगी; नवे नियम काय असणार? जाणून घ्या

4 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक

राज्य सरकारच्या सुधारीत नवीन नियमावलीनुसार जिम आणि ब्युटीपार्लरवरील निर्बंध मागे घेण्यात आले आहेत. 50 टक्के क्षमतेने जीम आणि ब्युटी पार्लर सुरू करण्यास राज्य सरकारने परवानगी देण्यात आली आहे. याबाबतचे नवे आदेश रविवारी जारी करण्यात आले आहेत. 10 जानेवारीपासून हे आदेश लागू होणार आहेत.

दरम्यान, यामध्ये नवीन नियमांचे पालन करणे गरजेचे असणार आहे. यामध्ये जीम आणि ब्युटी पार्लरमध्ये काम करणाऱ्यांसह ग्राहकांनी लस घेणे गरजेचे आहे. या दोघांनी लसीचे दोन डोस घेतले असतील तरच त्यांना परवानगी मिळणार असल्याचे नवीन आदेशात सांगण्यात आले आहे.

आधीच्या आदेशात काय?

स्वीमिंग पूल, जिम, स्पा, वेलनेस सेंटर्स आणि ब्यूटी सलून्स बंद राहतील, असे आधीच्या आदेशात म्हटले होते. मात्र, या निर्णयाला मोठा विरोध करण्यात आला होता. जाहीर केलेल्या नवीन नियमावलीमध्ये थोडा बदल करून ब्युटी पार्लर सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र सलून आणि ब्युटी पार्लर असोसिएशनकडून करण्यात आली होती. राज्य सरकारने जाहीर केलेल्या नवीन नियमावलीमध्ये सलून व्यावसाय सुरू ठेवण्यास परवानगी दिली होती. मात्र जीम आणि ब्युटी पार्लरला परवानगी देण्यात आली नव्हती. त्यामुळे विरोध होत होता. तसेच आंदोलनाचा इशाराही देण्यात आला होता. मात्र अखेर काही नियम घालून परवानगी देण्यात आली आहे.

नियमावली : सर्व शाळा-महाविद्यालये १५ फेब्रुवारीपर्यंत बंद

 • रात्री ११ ते सकाळी ५ पर्यंत राज्यात सर्वत्र संचारबंदी
 • दिवसा जमावबंदी लागू. पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मज्जाव
 • अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडण्यास निर्बंध
 • शासकीय कार्यालयात प्रवेश बंद आवश्यकता असल्यास मुख्य कार्यालयाची लेखी परवानगी आवश्यक
 • खासगी कार्यालये ५० टक्के कर्मचारी मर्यादा, दोन्ही डोस घेतलेल्यांना हजेरीस परवानगी, इतरांना वर्क फ्रॉम होम
 • लग्न समारंभासाठी ५० जणांना परवानगी
 • अंत्यविधी आणि अंत्यसंस्कारासाठी २० जणांना परवानगी
 • सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि राजकीय कार्यक्रमासाठी ५० जणांना परवानगी
 • शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस १५ फेब्रुवारीपर्यंत बंद
 • हेअर कटिंगची दुकाने ५० टक्के क्षमतेने सुरू, रात्री १० ते सकाळी ७ पर्यंत बंद राहणार
 • पर्यटनस्थळे बंद, पार्क, प्राणिसंग्रहालय, गड-किल्ले, म्युझियम, एंटरटेनमेंट पार्क पुढील आदेशापर्यंत बंद राहणार आहे
 • शॉपिंग मॉल आणि बाजारपेठा, बाजार संकुले ५० टक्के क्षमतेने सुरू
 • रेस्टॉरंट ५० टक्के क्षमतेने सुरू, पण रात्री १० पर्यंत परवानगी. होम डिलिव्हरी सुरू राहणार आहे
 • नाट्यगृहे, सिनेमागृहे ५० टक्के क्षमतेने सुरू राहतील. क्षमता बोर्डावर प्रदर्शित करावी.
 • नाट्यगृहे, सिनेमागृहांत संपूर्ण लसीकरण झालेल्यांनाच परवानगी, मात्र रात्री १० ते सकाळी ८ नाट्यगृहे-सिनेमागृहे बंद
 • सार्वजनिक वाहतुकीसाठी लसीचे दोन डोस आवश्यक.
बातम्या आणखी आहेत...