आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखलेंचे रोखठोक मत:म्हणाले- आता शिवसेना-भाजपने एकत्रं येण्याशिवाय पर्याय नाही; कंगना आणि आर्यन खान प्रकरणावरही दिली प्रतिक्रिया

15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेते विक्रम गोखले यांनी मीडियाशी संवाद साधताना आपले रोखठोक मत व्यक्त केले आहे. शिवसेना आणि भाजप एकत्र यायला हवे अशी इच्छा व्यक्त करत विक्रम गोखले म्हणाले की, ज्या कारणाने बाळासाहेब यांनी शिवसेना स्थापन केली, त्या बाळासाहेबांच्या आत्म्याला किती यातना होत असतील याचा प्रत्यय मला आहे. हे गणित चुकलेले आहे हे सुधारायचे असेल तर भाजप आणि शिवसेना एकत्र आल्याशिवाय पर्याय नाही. माझे प्रयत्न चालू आहेत असे गोखले म्हणाले.

आर्यन हिरो नाही, शाहरुख...
यावेळी त्यांनी आर्यन प्रकरणावरही भाष्य केले. मी अत्यंत स्पष्ट सांगतो. शाहरुख खान आणि आर्यन माझे काहीही वाकडे करू शकणार नाही. देशाच्या बॉर्डरवर 21 वर्षाचा जवान गोळी लागून मरतो तेव्हा तो खरा हिरो असतो. आर्यन हिरो नाही, असे त्यांनी सांगितलं.

कंगना जे म्हणाली ते खरे...

यावेळी त्यांनी अभिनेत्री कंगना रणावतच्या वक्तव्याचं समर्थन केले. कंगना जे म्हणाली ते खरे आहे. कंगनाने केलेल्या वक्तव्यावर गोखले म्हणाले की, "हे स्वातंत्र्य भीक मागूनच मिळाले आहे. हे स्वातंत्र्य कोणीही दिलेले नाही. आपले स्वातंत्रवीर जेव्हा फाशीवर जात होते तेव्हा फाशीपासून त्यांना वाचवले नाही, हे चुकीचे आहे. मतपेढीचे राजकारण सुरू झाल्यापासून वाद निर्माण होत आहेत."

"लाल बहादूर शास्त्री सोडून आतापर्यंत देशातील सर्व पंतप्रधानांना मी शंभराच्या खाली गुण देतो. पण त्यांची जयंती ही 2 ऑक्टोबरला येते ती हेतुपुरस्सर पुसली जाते. त्याचा विसर पाडला जातो. किती वर्षे कारस्थान आहे? हा देश कधीही हिरवा होणार नाही हा देश भगवा राहिला पाहिजे." असे विधान विक्रम गोखले यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...