आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोठी बातमी:शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची प्रकृती चिंताजनक; पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार

24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सध्या त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. त्यांची तब्येत चिंताजनक असल्याचे त्यांचा मुलगा अमृत पुरंदरे यांनी सांगितले.

''बाबासाहेब पुरंदरे यांना न्यूमोनिया होऊन वृद्धपकाळाने ते गेल्या आठवडाभरापासून दिनानाथ रुग्णालयामध्ये दाखल आहेत. प्रकृती खूप खालावलेली असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत'', अशी माहिती दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचे जनसंपर्क अधिकारी शिरीष याडकीकर यांनी दिली आहे.

बाबासाहेब पुरंदरे यांनी 29 जुलै रोजी वयाच्या शंभराव्या वर्षात पदार्पण केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून राज्यातील सर्वच नेत्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचवले. त्यांच्या या कार्याबद्दल महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन गौरव केला होता.

बातम्या आणखी आहेत...