आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीव्र पावसाचे ढग:राज्यात विजांच्या कडकडाटात मुसळधार पावसाची शक्यता; पुणे आणि अहमदनगरमध्ये पावसाला सुरुवात

7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मान्सूनच्या पावसाने गेल्या दोन आठवड्यांपासून जोरदार हजेरी लावली आहे. अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुणे आणि अहमदनगरमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात देखील झाली आहे.

उत्तर, मध्य महाराष्ट्र, मध्य मराठवाड्याचा भाग, पालघर , पुणे आणि विदर्भातील काही भागात तीव्र पावसाचे ढग दिसत असून पुढील 3-4 तासांत जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ढगांच्या गडगडाटासहीत पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे, अशी माहिती के. एस. होसाळीकर यांनी ट्विटच्या माध्यमातून दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...