आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साकीनाका बलात्कार प्रकरण:दीशा, शक्ती आणि फास्ट ट्रॅक कायदा कुठे गेला? प्रवीण दरेकरांचा सवाल, किमान अशा घटनेत तरी राजकारण न करण्याचं आवाहन

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईतील साकीनाका बलात्कार प्रकरणात मृत्यू पावलेल्या महिलेचा जीव पुन्हा येऊ शकणार नाही. ही अत्यंत हृदयद्रावक अशी घटना आहे. या घटनेतील पीडित महिलेचा मृत्यू झाल्याचा मला चित्रा ताईंचा फोन आला. दीशा, शक्ती आणि फास्ट ट्रॅक कायदा कुठे गेला, असा सवाल विधान परिषदेचे पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे.

सध्याचे कायदे अंमलात आणले तरीही अनेक गोष्टी होऊ शकतील. पण सरकारला फक्त राजकारण करायचे आहे. किमान अशा घटनेत तरी राजकारण नको असे आवाहन दरेकर यांनी केले आहे. तुम्ही जर अशा घटनांमध्येही राजकारण करणार असाल तर जो उद्रेक होईल तो सरकारला परवडणार नाही असाही इशारा दरेकर यांनी दिला.

एकीकडे मुंबईला सुरूक्षित शहर म्हणून पाहिले जायचे. पण अशा घटनांमुळे शहराच्या वैभवाला डाग लागण्याचा प्रकार हा सरकारच्या नाकर्तेपणामुळे झाल्याचे दरेकर म्हणाले. अशा घटनांचे कोणीही राजकारण करू नये असेही ते म्हणाले.

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर आणि महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकुर या संपुर्ण घटनेचे राजकारण करताना दिसत आहेत. पण अशा घटनांमध्ये राजकारण होते याची लाज लाटते, असे दरेकर म्हणाले. महाराष्ट्राची तुलना ही बिहार आणि उत्तर प्रदेशसोबत करताना महाराष्ट्रात काय घडत आहे हेदेखील तपासून पाहण्याची गरज असल्याचे दरेकर म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...