आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Maharashtra Update | ST Workers Strike | Latest News | Transport Minister Anil Parab | Gopichand Padalkar | Sadabhau Khot

एसटी संप सुरुच:ठाकरे सरकारकडून पगारवाढीची घोषणा, मात्र एसटी कर्मचारी विलीनीकरणावर ठाम; कर्मचाऱ्यांशी चर्चा करुन उद्या ​​​​​​​निर्णय जाहीर करु; खोत-पडळकरांची माहिती

2 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांसाठी पगारवाढीचा निर्णय घेतला आहे. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून कर्मचारी राज्य सरकारमध्ये विलिनीकरणाची मागणी करीत आहेत. राज्य सरकारने विलीनकरणावर निर्णय न घेता पगारवाढीचा पर्याय पुढे करून दिला. असे असले तरी कर्मचाऱ्यांनी याबाबत संतप्त भूमिका घेतली. अनिल परब यांनी मोठी घोषणा केली असली तरी आझाद मैदानावरील एसटी कर्मचारी अद्यापही विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत.

दरम्यान, एसटी कर्मचारी उद्या सकाळी आपला निर्णय जाहीर करणार आणि त्यांच्याशी सविस्तर चर्चा करुन संपावर निर्णय जाहीर करणार, अशी माहिती गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी दिली आहे.

एसटी कर्मचाऱ्यांचे सुधारित वेतन कसे असेल?

1. नवीन कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनामध्ये सरासरी 5000 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे इतर भत्त्यासह त्यांच्या मूळ वेतनामध्ये 7,200 रुपये वाढ होतील.

2. दहा वर्षे सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनामध्ये सरासरी 4000 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे इतर भत्त्यासह त्यांच्या मूळ वेतनात 5,760 रुपये वाढ होतील.

3. ज्या कर्मचाऱ्यांची 20 वर्षे सेवा पूर्ण झाली आहे त्यांच्या मूळ वेतनात सरासरी 2,500 रुपये वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे इतर भत्त्यासह त्यांच्या वेतनात 3,600 रुपयांची वाढ झाली आहे.

4. ज्या कर्मचाऱ्यांची सेवा 30 वर्षे किंवा त्याहून जास्त झाली आहे त्यांच्या मूळ वेतनामध्ये सरासरी 2,500 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांना इतर भत्त्यासह 3,600 रुपयांची वाढ मिळणार आहे.

बातम्या आणखी आहेत...