आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सातारा:चारित्र्याच्या संशयावरून पत्नीला पतीने पेटवले, महाबळेश्वरच्या व्हॅली व्ह्यू येथील थरारक प्रकार

सातारा22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • माणूसकीला काळीमा फासणाऱ्या एका भयंकर घटनेने आज महाबळेश्वर हादरले.

चारित्र्याच्या संशयावरून राजेंद्र महादेव जाधव (वय 55 रा व्हॅलीव्हयुवरोड प्राथमिक शाळा क्र 2 च्या मागे महाबळेश्वर ) या नराधमाने आज सकाळी आपल्या पत्नीच्या अंगावर पेट्रोल टाकुन तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. पत्नीला पेटवून नराधम फरार झाला असुन महाबळेश्वर पोलिस या नराधामाचा शोध घेत आहे. दरम्यान घटना स्थळास आज उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. शितल जान्हवे कराडे यांनी भेट दिली. दरम्यान महाबळेश्वर पोलिस नराधम पतीचा शोध घेत आहेत.

माणूसकीला काळीमा फासणाऱ्या एका भयंकर घटनेने आज महाबळेश्वर हादरले. प्राथमिक शाळा क्र २ च्या इमारतीच्या मागे एका चाळीत वेण्णालेक येथे घोडे व्यवसाय करणारा राजेंद्र महादेव जाधव हा आपली पत्नी बायना व प्रकाश, श्रीकांत व सचिन ही तीन मुले व एक मुलगी विदया असे एकत्र राहतात. राजेंद्र हा दारूडया असुन तो रोज आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा. या वरून पतीपत्नीमध्ये वारंवार भांडणे व्हायची. आज सकाळी पती घरी नसताना पावणे आठच्या दरम्यान पत्नी नैसर्गिक विधीसाठी गेली होती. त्यावेळी पती हा घरी आला त्याने पाहिले पत्नी घरात नाही व सर्व मुले ही झोपली आहेत. त्यावेळी या नराधमाने आपल्या चाळीतील घराला बाहेरून कुलूप लावले घराशेजारी असलेल्या एका गल्लीत तो आपल्या पत्नीची वाट पहात होता. त्यावेळी पत्नी दिसताच त्याने तिच्या अंगावर पेट्रोल टाकत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

यावेळी त्याने महिलेला पेटवले. पत्नीने आराडा ओरडा केल्याने नराधम पतीने घटना स्थळावरून पळ काढला. महिलेच्या किंकाळ्यांनी चाळीतील लोक धावतच बाहेर आले. नागरिकांनी समय सुचकता दाखवत महिलेच्या अंगावर पाणी टाकुन आग विझवली. मुलांनी आईला स्थानिकांच्या मदतीने सातारा येथील शासकिय रूग्णालयात दाखल केले आहे. दरम्यान या घटनेची माहिती समजताच, वाई उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. शितन जान्हवे कराडे यांनी आज दुपारी घटना स्थळाला भेट देऊन पाहणी केली. तसेच या घटनेच्या तपासाबाबत महाबळेश्वर पोलिसांनी मार्गदर्शन केले. संशयित आरोपी राजेंद्र जाधव याच्यावर महाबळेश्वर पोलिसांनी भादवी 307 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...