आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यात कोरोना रुग्णांची संख्या आणि या रोगामुळे मरणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने संपूर्ण राज्यात वीकेंड लॉकडाऊनची घोषणा केली आहे. यानुसार, 30 एप्रिलपर्यंत प्रत्येक आठवड्याच्या शनिवारी आणि रविवारी कडक लॉकडाऊन लागू असेल. या काळात फक्त अत्यावश्यक सेवांना परवानगी असेल. या वीकेंड लॉकडाऊनचे अनेक शहरांत पालन केल्याचे पाहायला मिळत आहे. पाहुया राज्यातील विविध शहरांमधील वीकेंट लॉकडाऊनची परिस्थिती...
महाराष्ट्रातील बसेसला गुजरातमध्ये प्रवेश बंदी
महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर गुजरात सरकारने महाराष्ट्रातील खाजगी बसेसला गुजरात राज्यात प्रवेश बंदी केली आहे. यामुळे महाराष्ट्र-गुजरात सीमेवरील नवापूर सीमा तपासणी नाक्यावर 25 ते 30 बसेस रात्री पासून उभ्या असून प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहे. याशिवाय, प्रवाशांचे हालही होत आहे. अनेकांना पायी आपल्या घराकडे जावे लागत आहे.
वीकेंड लॉकडाऊनला पुण्यात चांगली प्रतिसाद
राज्यात सर्वाधिक रुग्ण हे पुण्यात निघत आहेत. येथे दररोज हजारोंच्या संख्येने कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळत आहेत. दरम्यान, राज्यात लागू करण्यात आलेल्या वीकेंड लॉकडाऊनला पुणेकरांनी चांगला प्रसिसाद दिल्याचे पाहायला मिलत आहे. आज शहरातील मंडई, तुळशीबाग,लक्ष्मी रोड, बेलबाग चौक आणि स्वारगेटसह पुण्यातील अनेक भागांमध्ये चितपाखरुही दिसत नाहीय.
साताऱ्यात एसटी स्टँड पडले ओस
तिकडे सातारकरांनीही या वीकेंड लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद दिल्याचे पाहायला मिळत आहे. या वीकेंड लॉकडाऊनमध्ये साताऱ्यातही नागरिकांकडून कडकडीत बंद पाळण्यात येत असून, रस्त्यावर कुणीच फिरताना दिसत नाही. साताऱ्यातील एसटी स्टँडही ओस पडलेले दिसत आहे.
उपराजधानीत शुकशूकाट
राज्याची उपराजधानी नागपूरमध्येही या वीकेंड लॉकडाऊनचा चांगला प्रसिसाद पाहायला मिळत आहे. शहरात दररोज प्रचंड गर्दी पाहायला मिळायची. पण, आता संपूर्ण शहरात शुकशूकाट दिसत आहे. काही ठिकाणी तुरळक लोक दिसत असून, नागपुरकरांनी लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद दिला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.