आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शरद पवारांचा हल्लाबोल:म्हणाले- केंद्र सरकारकडून तपास यंत्रणांचा गैरवापर होतोय, वीजटंचाईला राज्य सरकारला दोषी धरणे बरोबर नाही; इंधन दरवाढीवरुनही साधला निशाणा

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाना साधला आहे. त्यांनी सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न वाढलेत. मात्र केंद्र सरकारला काही फिकीर नाही. तेलाचे आंतरराष्ट्रीय दर कमी झाले आहेत. तरी केंद्र सरकारने किमती कमी केलेल्या नाहीत, अशी टीका पवार यांनी केली आहे. तसेच केंद्र सरकार कशा पद्धतीने यंत्रणांचा चुकीचा वापर करत आहे, याचा पाढाच त्यांनी वाचून दाखवला. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शरद पवार पिंपरी-चिंचवडमध्ये आले होते, यावेळी त्यांनी माध्यमाशी संवाद साधला.

पेट्रोल डिझेल दरवाढीवरून टीका
केंद्र सरकारला सामान्य लोकांविषयी आस्था नाही. पेट्रोल डिझेलच्या किंमतीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. केंद्र सरकार सामान्य माणसाला महागाईच्या दरीत ढकलते आहे. आजची देशाची आणि राज्याची परिस्थिती आगळी-वेगळी आहे. सामान्यांचे प्रश्न वाढत आहेत. पण केंद्राला याची आस्था नाही. प्रत्येक दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढतच आहेत हे असे कधी घडले नव्हते. केंद्र म्हणते आंतरराष्ट्रीय बाजारात किंमती वाढल्याने हे होते. पण काही दिवसांपूर्वी आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किंमती कमी झाल्या तरी केंद्राने आपल्या देशात किमती कमी केल्या नाहीत.

वीजटंचाईवरुन टीकास्त्र
कोळशाच्या किमती कमी करण्याचा आग्रह राज्य सरकारने केंद्र सरकारकडे केला आहे. राज्य सरकारकडे 3 हजार कोटी थकबाकी असल्याचे केंद्रीय मंत्री सांगत आहेत. या थकबाकीमुळे कोळसा संकट निर्माण झाले, असे सांगितले जात आहेत. पण केवळ 10 ते 12 दिवस उशीर झाला तर असे आरोप केले जात आहे. वीजटंचाईला राज्य सरकारला दोषी धोरणे बरोबर नाही,” असे शरद पवार म्हणाले.

'हा काय प्रकार आहे?'
राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपच्या इतर नेत्यांनी काही प्रतिक्रिया दिली किंवा आरोप केल्यानंतर लगेच तपास यंत्रणांकडून कारवाया केल्या जात आहेत. हा काय प्रकार आहे? राज्यात हे पहिल्यांदाच घडत आहे, असेही पवारंनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...