आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महाराष्ट्राचा सुपुत्र शहीद:जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण, गोंदिया जिल्ह्यातील नरेश उमराव बडोले शहीद

नवी दिल्ली7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • नरेश बडोले यांचे मूळ गाव गोंदिया जिल्ह्यातील अर्जनी तालुक्यातील बाम्हणी हे होते.

जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण आले आहे. गोंदियाचे जवान नरेश उमराव बडोले (वय 49) हे शहीद झाले आहेत. केंद्रीय राज्य राखीव दलाच्या (सीआरपीएफ) 117 बटालियनमध्ये ते कार्यरत होते.

बडगाम जिल्ह्यात दहशतवाद्यांकडून केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या गस्त पथकावर हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात सीआरपीएफच्या 117 बटालियनचे सहाय्यक उपनिरीक्षक नरेश उमराव बडोले जखमी झाले होते. उपचारादरम्यान त्यांना वीरमरण आले.

नरेश बडोले यांचे यांचे मूळ गाव गोंदिया जिल्ह्यातील अर्जनी तालुक्यातील बाम्हणी हे होते. 25 एप्रिल 1971 रोजी त्यांचा जन्म झाला होता. तर 1989 मध्ये ते सीआरपीएफला रुजू झाले होते. बंदिपोरा परिसरात पहाटे साडे सात वाजण्याच्या सुमारास दहशतवाद्यांकडून करण्यात आलेल्या हल्ल्यात ते जखमी झाले होते. दहशतवाद्यांनी सीआरपीएफ जवानांवर गोळीबार केला होता. हल्ल्यानंतर दहशतवाद्यांनी नरेश बडोले यांची रायफल घेऊन घटनास्थळावरुन पळ काढला असल्याचे वृत्त आहे. नरेश बडोले यांना तात्काळ लष्कर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

बातम्या आणखी आहेत...