आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Maharastra Corona News And Updates, Lockdown In Maharashtra Till June 1st, Corona Test Mandatory For Arrival In State

शासनादेश जारी:1 जूनपर्यंत लाॅकडाऊन, महाराष्ट्रात येण्यासाठी कोरोना चाचणी अनिवार्य

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • म्यूकरमायकोसिस औषधाच्या दरात घट
  • राज्य सरकारची केंद्राकडे 20 लाख डोसची मागणी

राज्यात कोरोनाचा संसर्ग ग्रामीण भागात वाढत असल्यामुळे राज्य सरकारने ब्रेक द चेनअंतर्गत लागू करण्यात आलेले कडक निर्बंध हे १ जून सकाळी ७ वाजेपर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय गुरुवारी घेतला आहे. याबद्दलची नियमावली राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्या स्वाक्षरीने जाहीर करण्यात आली आहे.

बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत लाॅकडाऊन वाढवण्यावर चर्चा झाली होती. त्यानुसार गुरुवारी अादेश निघाले. या काळासाठी पूर्वीचीच नियमावली कायम अाहे. सध्या सुरू असलेल्या निर्बंधांची मुदत शनिवारी संपत आहे. त्या पार्श्वभूमीवर दोन दिवस आधी नियमावली जारी करण्यात आली. दरम्यान, गेल्या ४० दिवसांपासून व्यापार ठप्प झाला असून त्यावर तत्काळ तोडगा न काढल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा व्यापाऱ्यांनी दिला आहे.

म्यूकरमायकोसिस आैषधाच्या दरात घट अन् २० लाख डोसची केंद्राकडे मागणी

म्यूकरमायकोसिस आजाराचे राज्यात १५०० रुग्ण असून रुग्णसंख्येत वाढ होते आहे त्यामुळे त्याच्या इंजेक्शनचा महाराष्ट्रासाठी कोटा वाढवून मिळावा आणि या औषधाचे दर कमी करण्यात यावे तसेच राज्यातील नागरिकांचा लसीचा दुसरा डोस पूर्ण होण्यासाठी तातडीने २० लाख डोस द्यावेत, अशी मागणी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे केल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी दिली. केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी व्हीसीद्वारे महाराष्ट्रासह सहा राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांशी संवाद साधला. राज्यातील परिस्थिती नियंत्रणात असतानाच कोल्हापूर, सांगली, सातारा, बीड अशा काही जिल्ह्यांमध्ये रुग्ण वाढत असल्याचे टोपे म्हणाले.

पूर्वीचेच नियम कायम : दुग्ध व्यवसाय, घरपोच सेवेस परवानगी

1- या काळात दुग्ध व्यवसाय करणाऱ्यांना मुभा देण्यात आली आहे, तसेच घरपोच सेवा विक्री यासाठीही परवानगी कायम आहे. 2- इतर राज्यांतून महाराष्ट्रात येण्यासाठी ४८ तास आधी कोरोनाची आरटीपीसीआर टेस्ट गरजेची आहे. 3- परराज्यातून मालवाहतूक करणाऱ्या गाड्यांमध्ये दोन जणांना प्रवास मुभा. त्यासाठी आरटीपीसीआर टेस्ट गरजेची. 4- पुढील दुकाने सकाळी ७ ते ११ या वेळेत खुली राहतील : किराणा दुकाने, दूध व दुग्धजन्य पदार्थ विक्री, भाजीपाला विक्री, फळे विक्री, अंडी, मटण, चिकन, मासे विक्री, कृषी सेवा / दुकाने, पशुखाद्य विक्री, बेकरी, मिठाई दुकाने, सर्व प्रकारची खाद्यपदार्थ दुकाने, पाळीव प्राण्यांची खाद्य दुकाने, पावसाळ्याशी संबंधित वस्तूंची दुकाने यांना सकाळी ७ ते ११ या वेळेत विक्रीची मुभा असेल. 5- रुग्णसंख्या वाढत असल्यास स्थानिक प्रशासन त्यांच्या कार्यक्षेत्रात कडक लाॅकडाऊन घोषित करू शकते, पण त्यापूर्वी ४८ तास पूर्वकल्पना द्यावी लागणार आहे.

५० हजार कोटींचा फटका : व्यापारी
ठाकरे सरकारने लॉकडाऊनला १ जूनपर्यंत मुदतवाढ दिल्याने आता राज्यातील व्यापारी वर्ग आक्रमक होण्याची शक्यता आहे. लॉकडाऊनच्या काळात ई-कॉमर्स कंपन्यांना ऑनलाइन विक्रीची मुभा आहे. याउलट गेल्या ४० दिवसांपासून दुकाने बंद असून या काळात दुकानदार, व्यापाऱ्यांचे ५० हजार कोटींचे नुकसान झाले. यावर सरकारने तत्काळ तोडगा न काढल्यास आम्ही न्यायालयात जाऊ, असा इशारा फेडरेशन ऑफ रिटेल वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष वीरेन शहा यांनी दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...