आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यात आज दिवसभरात 4 हजार 154 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तर 4 हजार 524 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच 44 कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू देखील झाला आहे.
राज्यातील कोरोना संसर्गाची दुसरी लाट अद्याप पूर्णपणे ओसरलेली नाही. शिवाय, तिसऱ्या लाटेचा शक्यता देखील वर्तवली जात आहे. त्यात अजूनही कोरोना रूग्णांच्या मृत्यू संख्येतही भर पडतच आहे. तर, दररोज आढळणारी करोनाबाधितांची संख्या ही करोनातून बरे होत असलेल्यांच्या तुलनेत कधी कमी तर कधी जास्त आढळून येत आहे.
राज्यात आजपर्यंत एकूण 62,99,179 करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) 97.05 टक्के एवढा झाला आहे.
राज्यातील करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 64,91,179 झाली आहे. तर, राज्यात आजपर्यंत 1,38,061 करोनाबाधितांचा मृत्यू झालेला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.12 टक्के एवढा आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.