आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Maharastra Corona Virus Outbreak Updates: CM Uddhav Thackeray Interact With Sarpanches Of State; News And Live Updates

कोरोना महामारी:तिसरी लाट रोखण्यासाठी गाव कोरोनामुक्त करा : मुख्यमंत्री; राज्यातील सरपंचांशी संवाद साधणार

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • लॉकडाऊन 15 जूनपर्यंत वाढ करण्याची घोषणा

राज्यातील जनतेने दुसरी लाट थाेपवण्यासाठी चांगले काम केलेले असले तरी तिसरी लाट राेखण्याासाठी काेविडमुक्त गाव करण्याचा संकल्प करून देशासमाेर एक उत्तम उदाहरण घालून द्या, असे अावाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी राज्यातील जनतेशी समाजमाध्यमाद्वारे थेट संवाद साधताना केले. या वेळी त्यांनी लाॅकडाऊन वाढवण्याची घोषणा केली. पहिल्या लाटेच्या उच्चांकात सक्रिय रुग्ण ३ लाख १ हजार ७५२ होते. आज तीन लाख १ हजार ५४२ आहेत. मागील लाटेत मृत्युदर २.६५ टक्के होता, या वेळी तो १.६२ टक्के आहे. मृत्युदर घटला असला तरी रुग्णसंख्या कायम असल्याचे सांगत लाॅकडाऊन वाढवण्याचे उद्धव यांनी समर्थन केले. दुसऱ्या लाटेचा आपण चांगला मुकाबला केला.

सध्या ग्रामीण भागात कोराेना वाढतो आहे. त्यामुळे कोरोनामुक्त गाव करण्यासाठी पुढे या. आपले गाव कोरोनामुक्त करा, असे आवाहन या वेळी ठाकरे यांनी ग्रामपंचायत सदस्यांना केले. महाराष्ट्र देशात प्रथम तज्ञ डाॅक्टरांचा टास्क फोर्स केला. त्यामुळे उपचार पद्धतीत एकसूत्रता येत आहे. राज्यातील १७ हजार फॅमिली डाॅक्टर, ६ हजार बालरोगतज्ञ, महाराष्ट्र वैद्यक परिषदेचे २१ हजार डाॅक्टर्स अशा ४५ हजार प्रत्यक्ष, तर ५० हजार दर्शक अशा १ लाख डाॅक्टरांशी टास्क फोर्सने संवाद साधल्याचे उद्धव म्हणाले.

नुकसानग्रस्तांना मदतीसाठी जे निकष आहेत ते केंद्र सरकारने बदलायला हवेत, जेणेकरून लोकांना जास्त मदत करता येईल. गेल्यावेळची लाट ही सणासुदीनंतर आली होती. अजूनही आपण म्हणावे तेवढे खाली आलेलो नाहीत. रुग्णसंख्या कमी होत आली असली तरी गेल्यावेळची सर्वोच्च रुग्णसंख्येच्या बरोबरीची संख्या आहे, असे त्यांनी सांगितले. आताचा जो विषाणू आहे तो झपाट्याने वाढतो आहे. तो झपाट्याने पसरतो आहे. रुग्णाला बरे व्हायला उशीर लागतो आहे, असे सांगत कोराेनाची तिसरी लाट आपल्या वागणुकीवर अवलंबून आहे, ती काही तारीख सांगून येणार नाही, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला.

पावसाळ्याच्या काळात साथीचे आजार येतील. त्यामुळे कोविड आणि नाॅन कोविड रुग्ण ओळखणे अवघड जाणार आहे. त्यामुळे रुग्णालयातल्या खाटा अडवल्या जातील. म्हणून फॅमिली डाॅक्टरांची जबाबदारी वाढली असल्याचे उद्धव यांनी स्पष्ट केले. पावसाळा ताेंडावर आहे. कृषिविषयक सर्व कामे सुरू राहतील. शेतकऱ्यांना बियाणे, खते, औजारे घेण्यासाठी दुकाने चालू असतील. फक्त शेतकऱ्यांनी गर्दी करू नये, असे आवाहन त्यांनी केले.

राज्यातील सरपंचांशी संवाद साधणार
माझे गाव कोरोनामुक्त करेन असे प्रयत्न व्हायला हवेत. अहमदनगर जिल्ह्यात पोपटराव पवार, सोलापूर जिल्ह्यात ऋतुराज देशमुख आणि कोमलताई या सरपंचांनी ते करून दाखवले आहे. मी या तिघांशी बोलणार आहे. तसेच राज्यातील सरपंचांशी त्यांचं बोलणं करून देणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.

बातम्या आणखी आहेत...