आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Maharastra Coronavirus Outbreak Updates: The Number Of Active Patients Has Decreased By 23.55% As Compared To The First Wave, News And Live Updates

महाराष्ट्रातील कोरोना नियंत्रणात:पहिल्या लाटेच्या तुलनेत 23.55% सक्रिय रुग्ण कमी झाले, राज्यात आता 205 दिवसात दुप्पट होत आहेत रुग्ण

मुंबई17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • महाराष्ट्र राज्यात कोरोनाची पहिली लाट ही 23 सप्टेंबरला आली होती

महाराष्ट्र राज्यांत कोरोनाचा प्रार्दुभाव आता कमी होताना दिसत आहे. कोरोनाच्या सक्रिय रुग्ण संख्येतही झपाट्याने घट पाहायला मिळत आहे. राज्यात कोरोनाच्या पहिल्या लाटेत सक्रिय रुग्णांचा आकडा 3 लाख 1 हजार 752 होते. तर 1 जूनला सकाळी 2 लाख 30 हजार 681 सक्रिय रुग्ण होते. राज्यात कोरोना महामारीच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत सक्रिय रुग्णांच्या संख्येत 23.55% घट पाहायला मिळाले आहे.

महाराष्ट्र राज्यात कोरोनाची पहिली लाट ही 23 सप्टेंबरला आले असून यामध्ये एका दिवसात 21 हजार 029 रुग्ण आढळले होते. तर दुसरी लाट 22 एप्रिल रोजी आली असून यामध्ये एका दिवसांत 67 हजार 013 नवीन प्रकरणे समोर आले होते.

आरोग्य विभागाने मंगळवारी झालेल्या कॅबिनेट बैठकीत म्हटले की, कोरोनाच्या पहिल्या लाटेत देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईत सक्रिय कोरोना रूग्णांची संख्या 34 हजार 259 होती, त्यामध्ये आता घट होत 41.19% (20,147) वर आली आहे.

त्याचप्रमाणे पहिल्या लाटेत नाशिक जिल्ह्यातील सक्रीय रूग्णांची संख्या 16 हजार 554 होती. ती आता 51.32% ने कमी होऊन 8 हजार 059 वर आली आहे. पहिल्या लाटेच्या तुलनेत ठाणे जिल्ह्यात 52.23%, पुणे 63.38%, औरंगाबाद 60.70% आणि नागपूर 50.02% कमी सक्रिय रुग्ण आहे.

महाराष्ट्रातील मृत्यू दर चिंतेचा विषय
राज्यात एकीकडे कोरोनाचे नवीन रुग्ण कमी होत आहे तर दुसरीकडे राज्यातील मृत्यू दर चिंतेचा विषय बनत चालला आहे. कारण राष्ट्रीय पातळीवर मृत्यू दर 1.28% आहे, तर महाराष्ट्रात मृत्यू दर 1.67% आहे. असे असूनही, महाराष्ट्रातील हा मृत्यू दर ऑगस्ट 2020 ते मार्च 2021 या 8 महिन्यांच्या तुलनेत सर्वात कमी आहे. त्यासोबतच महाराष्ट्रातील कोरोना संसर्गाचे सरासरी प्रमाण गेल्या 10 महिन्यांत 0.34% वर आले आहे.

बातम्या आणखी आहेत...