आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:रत्नागिरी जिल्ह्यात कोकण रेल्वे मार्गावर इंजिन घसरले, वाहतूक ठप्प, कोणतीही जीवीतहाणी नाही

रायगडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • हा अपघात एैन बोगद्याजवळ घडल्याने रेल्वे सेवा काही काळासाठी ठप्प राहणार

हजरत निजामुद्दीन - मडगाव राजधानी सुपरफास्ट स्पेशल गाडीच्या इंजिनाचे पुढील चाक रुळावरून घसरून अपघात झाल्याची घटना कोकण रेल्वे मार्गावर घडली आहे. हा उपघात रत्नागिरी जिल्ह्यातील उक्षी आणि भोके दरम्यान करबुडे बोगदयामध्ये झाला आहे.

आज पहाटे 4.15 वाजता दरड कोसळल्याने हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. यामुळे घटनेमुळे या मार्गावरील सर्वच रेल्वे वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली आहे. घटनेची माहिती मिळताच रेल्वे अधिकारी पथकासह दुरुस्तीसाठी घटनास्थळी दाखल झाले आहे.

कोणतीही जीवीतहाणी नाही
सूत्रांच्या माहितीनुसार, राजधानी एक्स्प्रेसचे चाके रुळावरुन घसरले असून यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवीतहाणी झाली नसल्याचे सांगितले जात आहे. हा अपघात एैन बोगद्याजवळ घडल्याने रेल्वे सेवा काही काळासाठी ठप्प राहणार आहे.

मार्गावर धावणाऱ्या विविध गाड्या सध्या नजीकच्या स्टेशन वर थांबवण्यात आल्या आहेत. रेल्वे सेवा पूर्वपदावर आणण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू असल्याचे कर्मचाऱ्याने सांगितले.

बातम्या आणखी आहेत...