आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अजब दावा:लस घेतल्यानंतर हाताला चिकटल्या लोखंडी वस्तू, नाशिकमध्ये ठरला चर्चेचा विषय; पण दाव्यात तथ्य किती यावर शंका

नाशिक11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • लस घेतल्यानंतर लोखंडाच्या व स्टीलच्या वस्तू हाताला चिकटल्याचे प्रथमच एकतो आहे - डॉ. नवीन बाजी

कोरोना लसीबाबत सुरुवातीपासूनच नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा असताना, सिडकाेतील एका ज्येष्ठ नागरिकाने लस घेतल्यानंतर हाताच्या दंडावर लोखंडी व स्टीलच्या वस्तू चिकटत असल्याचा दावा केला अाहे. याबाबत मात्र हा संशाेधनाचा विषय असल्याचे डाॅक्टरांचे म्हणणे अाहे. सिडकोतील शिवाजी चौकात राहणारे अरविंद जगन्नाथ सोनार (७१) यांनी कोरोनाच्या कोविशिल्ड लसीचा दोन दिवसांपूर्वी दुसरा डोस एका खासगी हॉस्पिटलमध्ये घेतला.

त्यांचा मुलगा जयंत हा बातम्या बघत असताना कोरोनाबाबत लोखंडाच्या वस्तू चिकटत असल्याचे त्याला समजल्यावर त्याने वडिलांना तुमच्या हाताला वस्तू चिकटतात का? म्हणून वस्तू लावून बघितल्या तर आश्चर्य असे की खरोखरच वडिलांच्या हाताला लोखंडाच्या व स्टीलच्या वस्तू, पैसे, चमचे चिकटत असल्याचे निदर्शनास आले. हाताला घाम आला असेल म्हणून त्यांनी अाधी हात धुतला, मात्र पुन्हा हाच प्रकार घडला. त्यानंतर दुसऱ्या दिवशीही ताेच प्रकार घडला. याबाबत “दिव्य मराठी”ला कळताच आमच्या प्रतिनिधींनीही स्वतः खात्री करून हा प्रकार बघितला.

लस घेतल्यावरच...
मी लस घेतल्यानंतर हा अजब प्रकार घडत आहे. यापूर्वी माझ्या आयुष्यात अशा कोणत्याही वस्तू माझ्या अंगाला चिकटत नव्हत्या. हा नक्की काय प्रकार आहे? याबद्दल मी डॉक्टरांचा सल्ला घेणार आहे. - अरविंद सोनार, ज्येष्ठ नागरिक, सिडको

या प्रश्नांचे व्हावे निरसन

  • लस हेच एकमेव कारण असू शकते का?
  • किती लाेकांमध्ये हा अजब प्रकार दिसताे अाहे.
  • डाॅक्टर अाणि तज्ज्ञांनी याबाबत तत्काळ संशाेधन करून या प्रकारावर प्रकाश टाकावा.

हा संशाेधनाचा विषय अाहे
लस घेतल्यानंतर लोखंडाच्या व स्टीलच्या वस्तू हाताला चिकटल्याचे प्रथमच एेकताे अाहे. त्यांनी ज्या खासगी रुग्णालयात लस घेतली आहे, त्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. मात्र, असा प्रकार घडल्याचा यापूर्वी कुठलाही विषय आलेला नाही. अाता हा संशाेधनाचा विषय अाहे. - डॉ. नवीन बाजी, मनपा रुग्णालय, मोरवाडी

बातम्या आणखी आहेत...