आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Maharshtra Chief Minister News And Updates; It Will Be Mandatory To Wear A Mask Even After Receiving The Corona Vaccine: Chief Minister Uddhav Thackeray

जनतेशी संवाद:कोरोनावरील लस आल्यानंतरही मास्क लावणे बंधनकारक असेल- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • उद्धव ठाकरेंनी आज महाराष्ट्रातील जनतेला सोशल मीडियाच्या माध्यमातून संबोधित केले

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सोशल मीडियाच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी, कोरोना महामारीची लस आल्यानंतरही मास्क लावणे बंधनकारक राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. 'आपल्या सुरक्षेसाठी कोरोनाबाबतचे नियम आपल्याला पाळावेच लागणार आहेत, असेही त्यांनी म्हटले.

आपल्या संवादात मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, 'भारताचे आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी सांगितले आहे की, व्हॅक्सिन आली तरी मास्क लावावा लागेल. त्यामुळे माझ्या मते 6 महिने तरी मास्क लावावाच लागेल. पूर्ण नाही पण काही प्रमाणात तरी संसर्ग कमी होईल. जनतेने कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन केले पाहिजे, असे सांगणे कुटुंबप्रमुख म्हणून माझे कर्तव्य आहे, असेही मुख्यमंत्री ठाकरे यावेळी म्हणाले.

रात्रीची संचारबंदी लागू होणार नाही

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की 'काही जणांनी रात्रीची संचारबंदी लागू करण्याचे सूचवले आहे. काही जणांनी पुन्हा लॉकडाउन लागू करण्याचे सांगितले आहे. पण, मला वाटत नाही की, रात्रीची संचारबंदी आणि लॉकडाउन पुन्हा लागू करण्याची गरज आहे. मी जनतेला धन्यवाद देऊ इच्छितो की, बहुतांशी लोक सूचनांचे पालन करत आहेत. 70-75 टक्के लोक पालन करत आहेत परंतु उर्वरित लोकांमुळे हे खबरदारी घेणारे देखील धोक्यात येतील. परदेशातुन येणार्‍या प्रवाशांच्या टेस्ट थांबवा असे लोक म्हणत आहेत, परंतु कसे थांबवायचे? आपण धिम्या गतीने पुढे जात आहोत. सावधपणे पावले उचलत आहोत. अनुभवातुन आपल्याला शहाणपण आलेला आहे,' असेही ते म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...