आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mahavikas Aghadi Government Means 'Amar, Akbar, Anthony'; This Government Will Fall Due To Their Internal Differences Raosaheb Danve

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

टीकास्त्र:महाविकास आघाडी सरकार म्हणजे 'अमर, अकबर, अँथनी'; हे सरकार त्यांच्या अंतर्गत मतभेदांमुळे पडेल- रावसाहेब दानवे

पुणे7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'कृषी विधेयकांबद्दल काँग्रेस चुकीचा प्रचार करत आहे'

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आज पुणे दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. 'काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेनं तयार केलेले महाविकास आघाडी सरकार म्हणजे 'अमर, अकबर, अँथनी' सरकार आहे. हे सरकार त्यांच्या अंतर्गत मतभेदांमुळे पडेल,' असे मत दानवे यांनी यावेळी बोलू दाखवले.

यावेळी बोलताना रावसाहेब दानवे पुढे म्हणाले की, 'सहा वर्षांपासून काँग्रेस आणि विरोधी पक्षांना जनतेसमोर जाण्यासाठी मुद्दा सापडत नव्हता. काँग्रेस फक्त आपली खराब झालेली प्रतिमा सुधारण्यासाठी रस्त्यावर उतरला आहे. शेतकऱ्यांचा माल किमान किमतीत खरेदी करता येईल, असे सरकारने अधीय स्पष्ट केले आहे. पण, काँग्रेस पंबाज आणि हरियाणामध्ये रस्त्यावर उतरुन आंदोलने करत आहे.'

'मोदी सरकारने शेतकऱ्यांना मार्केटमधून मुक्त केले आहे. यापूर्वी अनेकदा शेतकऱ्यांना मार्केटमधूनही रिकाम्या हाताने परत जावे लागत होते. पण, आता तसे होणार नाही. आम्ही व्यापाऱ्यांचे वर्चस्व कमी केले आहे. यापुढे व्यापारी मार्केट कमिटीमधून बाहेर जाऊनही एखाद्या शेतकऱ्याचा माल खरेदी करू शकतो. शेतकऱ्यांना आम्ही पर्याय उपलब्ध करुन दिले आहेत. स्वामिनाथन आयोगाच्या 90 टक्के शिफारसी आम्ही लागू केल्या. काँग्रेस विधेयकांबद्दल चुकीचा प्रचार करत आहे', असे रावसाहेब दानवे यावेळी म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...