आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Make Wise Decisions By Drinking Cow's Milk; Letter From BJP State President Chandrakant Patil To The Chief Minister

भाजपचे आंदोलन:गायीचे दूध पिऊन न्याय बुध्दीने निर्णय घ्या; भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांकडून मुख्यमंत्र्यांना पत्र

कोल्हापूर3 महिन्यांपूर्वीलेखक: प्रिया सरीकर
  • कॉपी लिंक

गायीच्या दुधाला सरसकट १० रु./लिटर अनुदान व दुध पावडरला प्रति किलो ५० रु. अनुदान मागणी करिता १ ऑगस्ट २०२० रोजीच्या भाजपासह इतर पक्ष संघटनांच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे.

या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि दुग्ध विकास मंत्री सुनील केदार यांना ई-मेल द्वारे मागण्यांचे निवेदन पाठवले. यामध्ये निवेदनासोबात गायीचे पवित्र दुध आपणास व आपल्या मंत्री मंडळातील सर्व सहकार्या करिता पाठवीत आहोत. हे  दुध पिऊन आपण न्याय बुद्धीने सर्व मागण्या मान्य कराल हीच अपेक्षा आहे असे म्हटले आहे.

आंदोलनात भाजपसोबत रयतक्रांती संघटना, शिवसंग्राम, रासप, रिपाई सहभागी होणार आहेत.कोरोना काळात दुधाचे भाव कमी झाल्याने दुध उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था दयनीय झाली आहे. दुधाचा विक्रीमध्ये ३० टक्केपर्यंत घट झाली. शहरातील हॉटेल्स, चहाची दुकाने बंद असल्यामुळे दुधाची मागणी घटली. आजच्या घडीला खाजगी संस्था व सहकारी दुध संघाकडून दुध १५ ते १६ रु. दराने खरेदी केल्या जात आहे. त्यामुळे दुधाचा उत्पादन खर्च सुद्धा निघू शकत नाही. शासनाने १० लाख लिटर दुध २५ रु. प्रती लिटर या भावाने खरेदी करण्याची घोषणा केली होती. परंतु प्रत्यक्षात ७ लाख लिटर दुध खरेदी केल्या जात आहे. मंत्र्याचे लागेबांधे असलेल्या दूध संघाकडून शासन दुध विकत घेत आहे. इतर शेतकऱ्यांना व दुध उत्पादकांना शासनाने वाऱ्यावर सोडले आहे. असे निवेदनात नमूद केले आहे.