आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यंदा मान्सून वेळेआधी?:अंदमानमध्ये 13 ते 19 मे, तर तळ कोकणात 27 मे ते 2 जूनपर्यंत दाखल होण्याची शक्यता

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले असनी चक्रीवादळ ताशी 60 ते 70 किलोमीटर वेगाने बंगालच्या उपसागराच्या दिशेने वाटचाल करत आहे. या वादळामुळे राज्यात सध्या सर्वत्र ढगाळ वातावरण असून, अनेक भागांत पारा हा चढल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान भारतीय हवामान विभागाने मान्सून कधी दाखल होणार याबाबत माहिती दिली आहे. यंदा मान्सून वेळेआधीच दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. दरवर्षी अंदमानमध्ये पाऊस 22 मेपर्यंत दाखल होतो. मात्र, यंदा मान्सून 13 ते 19 मे दरम्यान म्हणजेच वेळेआधी दाखल होण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. त्यानंतर 20 ते 26 मेपर्यंत मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. तर तळ कोकणात 27 मे ते 2 जूनपर्यंत दाखल होण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

भारतीय हवामान विभागाने पुढील चार आठवड्यांच्या हवामानाचा अंदाज वर्तवला आहे. अंदमानच्या समुद्रावर 13 ते 19 मे दरम्यान मान्सून दाखल होणाची शक्यता आहे. दरवर्षी मान्सून अंदबारमध्ये 22 मेपर्यंत दाखल होतो. मात्र यंदा मान्सून वेळे आधी दाखल होणार असल्याचा अंदाज आहे.

तर स्कायमेटने दिलेल्या अंदाजानुसार, पुढील 24 तासात मराठवाडा आणि विदर्भाच्या वेगवेगळ्या भागात हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तर विदर्भात उष्णतेच्या लाटेची देखील शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हवामान विभागाने विदर्भात 12 मेपर्यंत उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला होता. मात्र बुधवारी विदर्भातील कमाल तापमानात सरासरीपेक्षा काही अंशी घसरण झाली असून मराठवाड्यातही सध्या ढगाळ वातावरण आहे. तर उत्तर महाराष्ट्र, कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत ढगाळ वातावरण असल्याने उन्हाची तीव्रता कमी होती. राज्यात महाबळेश्वर येथे कमाल तापमान हे 28.9 नोंदले गेले होते.

'असनी' बंगाल उपसागराच्या दिशेने

असनी चक्रीवादळ बुधवारी आंध्र प्रदेश किनारपट्टीला धडकल्यानंतर वादळ गुरुवारी हळूहळू बंगालच्या उपसागराकडे सरकत आहे. हवामान खात्याने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, हे चक्रीवादळ आज संध्याकाळपर्यंत बंगालच्या उपसागरात पोहोचेल. त्यानंतर ते शांत होऊ शकते.

बंगालच्या उपसागरात पोहोचत असताना, ओडिशा, आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर हलक्या आणि मुसळधार पावसासह वाऱ्याचा वेग ताशी 80 किमी आहे. या राज्यांच्या सीमेला लागून असलेल्या इतर राज्यांवरही वादळाचा परिणाम होणार आहे. बंगाल आणि ओडिशा लगतच्या झारखंड, बिहार आणि छत्तीसगडच्या काही भागात हलका पाऊस पडू शकतो. बुधवारीही या भागात पाऊस झाला होता.

बातम्या आणखी आहेत...