आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मान्सून एक्स्प्रेस!:48 तासांत केरळातून सोलापुरात दाखल; यंदा 99% पाऊस - आयएमडी

औरंगाबाद14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे.

केरळात यंदा निर्धारित वेळेच्या दोन दिवस उशिराने म्हणजे तीन जून रोजी दाखल झालेल्या मान्सूनने वेगाने वाटचाल करत अवघ्या ४८ तासांत महाराष्ट्र गाठला आहे. शनिवारी मान्सून एक्स्प्रेसने सोलापूरपर्यंत मजल मारली. सध्या मान्सूनची उत्तर दिशेची मर्यादा हर्णे बंदर, सोलापूर, रायचूर, कर्नूल, तिरुपती, कुड्डालोर अशी आहे. येत्या दोन दिवसांत मान्सूनची वाटचाल उर्वरित मध्य अरबी समुद्र, महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्र प्रदेशाचा आणखी काही भाग, तेलंगण व तामिळनाडूच्या उर्वरित भागात होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे.

केरळमध्ये दाखल झाल्यापासून नैऋत्य मोसमी वारे वेगाने उत्तर दिशेने प्रवास करत आहे. मान्सूनची अरबी समुद्रातील शाखा सध्या अत्यंत सक्रिय असून केरळपासून ते तळकोकण व दक्षिण महाराष्ट्र पर्यंतचा प्रवास या शाखेने अवघ्या ४८ तासांत पार केला आहे. शनिवारी मान्सूनने कर्नाटकची किनारपट्टी व गोवा व्यापत तळकोकणात प्रवेश करत हर्णे बंदर ते सोलापूरपर्यंत मजल मारली. मान्सूनचा वेग असाच राहिल्यास येत्या दोन दिवसांत तो महाराष्ट्र व्यापण्याची शक्यता आहे.

यंदा ९९% पाऊस
आयएमडीच्या अंदाजानुसार यदा मध्य भारतात सरासरीपेक्षा जास्त पाऊस होईल. ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी सांगितले की, राज्यात यंदा जून ते सप्टेंबर या काळात सरासरीच्या ९९ टक्के (यात ५ टक्के कमी-जास्त) पावसाची शक्यता आहे. या काळात विदर्भात १००%, मराठवाड्यात ९८%, उत्तर महाराष्ट्रात ९८%, मध्य महाराष्ट्रात ९९ % पावसाची शक्यता आहे.

पावसाचा इशारा
सध्या मान्सून सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यांत आता मान्सून दाखल झाला आहे. तर राज्याच्या उर्वरित भागात पूर्वमोसमी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुणे वेधशाळेनुसार दि. ५ ते ८ जून या काळात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.

बातम्या आणखी आहेत...