आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mansoon Updates: In The First Rains, Mumbai's Roads, Local Traffic Jams; Falling Trees With Houses; News And Live Updates

मान्सून अनलॉक, मुंबई लॉक:24 तासांत 328 मिमी पाऊस; पहिल्याच पावसात रस्ते, लोकल ठप्प; घरांसह वृक्षांची पडझड

मुंबई7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बस, कार, टॅक्सी किंवा दुचाकीने कामावर गेलेल्यांचे मोठे हाल

मान्सून बुधवारी मुंबईत धडकला अन् अनलाॅक मुंबई पुन्हा लॉक झाली. सायंकाळपर्यंत विक्रमी ३२८ मिमी पावसाने मुंबईतील रस्त्यांना नद्यांचे स्वरूप प्राप्त झाले. अनलॉकनंतरही मुंबईकरांना अजून लोकल प्रवेश नाही. मात्र, कार्यालये ५० टक्के उपस्थितीने सुरू आहेत. त्यामुळे बस, कार, टॅक्सी किंवा दुचाकीने कामावर गेलेल्यांचे मोठे हाल झाले. अनेकांनी गाड्या रस्त्यावर सोडून चालत घर गाठले

मान्सून एक्सप्रेस मालेगाव, नागपूरपर्यंत
मान्सूनने संपूर्ण कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्राचा काही भाग, मराठवाडा व विदर्भात नागपूरपर्यंत मजल मारली आहे. दोन दिवसांत महाराष्ट्र व्यापून मान्सून गुजरात, मध्य प्रदेशात दाखल होईल.

ऑरेंज अलर्ट ११५ ते २०४ मिमी पाऊस शक्य
मुंबई, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पुणे, नगर, कोल्हापूर, सातारा, गडचिरोली, गोंदिया.

यलो अलर्ट जोरदार वारे, १५ ते ६५ मिमी पाऊस शक्य
औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, परभणी, नांदेड, लातूर, अकोला, अमरावती, नागपूर. यवतमाळ, वर्धा, भंडारा, बुलडाणा, वाशीम.

ग्रीन अलर्ट उर्वरित जिल्ह्यांसाठी ग्रीन अलर्ट असून, १५ मिमीपेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे.

कशामुळे मुंबई तुंबली?
1. समुद्रास सकाळी ११.४३ वाजता ४.१६ मीटरची मोठी भरती होती. दरम्यान तुफान पावसामुळे पाण्याचा निचरा होऊ शकला नाही.
2. महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या, नालेसफाई १०४% झाली आहे. तासाभरात ६० मिमी पावसाने पाण्याचा निचरा झाला नाही.

मराठवाड्यात बरसला
औरंगाबाद, परभणी व नांदेड जिल्ह्यात पाऊस बरसला. औरंगाबाद-जळगाव महामार्गावरील गोळेगाव येथील जुई नदीवरील पर्यायी पूल वाहून गेला. नांदेडमध्ये दमदार पावसामुळे सखल भागात पाणी साचले. परभणी जिल्ह्यातही जोरदार पाऊस झाला. संबंधित. पान २

कुठे, किती पाऊस?
चेंबूर 328.28 मिमी बेलापूर320.80 मिमी विक्रोळी290.86 मिमी मुंब्रा247.10 मिमी कोपरखैरणे242.30 मिमी

रस्ते, लोकल ठप्प; घरांसह वृक्षांची पडझड
लोकल रेल्वेसेवा ठप्प झाली. ६ जागी घरे तर ३२ वृक्ष कोसळले. १४ ठिकाणी शाॅर्टसर्किटच्या घटना घडल्या. हिंदमाता, वडाळा, कुर्ला, माटुंगा, दादर सर्कल, खार, गोवंडी, चेंबूर, वांद्रे, अंधेरीत रस्त्यावर कमरेइतके पाणी तंुबले होते. पालिकेचे २०० पंप पाणी उपसत होते.

बातम्या आणखी आहेत...