आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मान्सून एक्स्प्रेस:अलिबाग, पुणे, उस्मानाबादसह लातुरात दाखल; मोसमी पाऊस मुंबई, औरंगाबाद, उत्तर महाराष्ट्र, विदर्भाच्या वेशीवर

औरंगाबाद13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • येत्या एक-दोन दिवसांत मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापण्याची शक्यता आहे.

केरळात तीन जून रोजी दाखल झालेले नैऋत्य मोसमी वारे वेगाने प्रवास करत पाच जून रोजी हर्णे बंदर ते सोलापुरात दाखल झाले होते. रविवारी मान्सून एक्स्प्रेसने २४ तासांत सुमारे २५० किलोमीटरचे अंतर कापत अलिबाग, पुणे, उस्मानाबाद ते लातूर जिल्ह्याचा काही भाग व्यापला. दरम्यान, राज्यात येत्या तीन ते चार दिवसांत सर्वत्र पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

केरळमध्ये दाखल झाल्यापासून मान्सूनने वेगाने प्रगती करत सर्वांचे अंदाज चुकवले आहेत. एरवी केरळ ते महाराष्ट्र या प्रवासासाठी सहा ते आठ दिवस घेणाऱ्या मान्सूनने यंदा केवळ ४८ तासांतच हा प्रवास पूर्ण केला आहे. पुणे वेधशाळेनुसार, राज्यात ७ ते १० जून या काळात सर्वत्र पावसाची शक्यता अाहे. कोकण - गोवासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा अाणि विदर्भात या काळात काही ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता अाहे.

मान्सूनने सर्वांनाच चकवले
भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (आयएमडी) कॅलेंडरनुसार ८ जून ते १५ जून या काळात मान्सून राज्यातील विविध भागात दाखल होणे अपेक्षित असते. यंदा मात्र मान्सूनने हे वेळापत्रक न पाळता सर्वांनाच चकवले अाहे. या कॅलेंडरनुसार राज्यातील निर्धारित वेळेअाधीच मान्सून दाखल झाला अाहे. या कॅलेंडरनुसार मान्सून कोल्हापूर येथे ८ जून, तर पुणे येथे १० जून रोजी दाखल होणे अपेक्षित असताना कोल्हापूर, सोलापुरात तो ५ जून रोजी, तर पुण्यात चार दिवस अाधीच ६ जून रोजी दाखल झाला अाहे.

या िजल्ह्यांत मान्सून दाखल
सध्या मान्सूनची राज्यातील उत्तरीय सीमा अलिबाग, पुणे, उस्मानाबाद, लातूर अशी अाहे. ६ जूनअखेर मान्सूनने सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे, उस्मानाबाद हे जिल्हे तसेच अहमदनगर व लातूर जिल्ह्याचा दक्षिण भाग व्यापला अाहे.

मान्सून या जिल्ह्यांच्या सीमेवर
सध्या मान्सून मुंबईच्या वेशीवर अाहे. ६ जूनअखेर मान्सून मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, नांदेड, हिंगोली व संपूर्ण विदर्भाच्या वेशीपर्यंत अालेला अाहे. येत्या एक-दोन दिवसांत मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापण्याची शक्यता अाहे.

बातम्या आणखी आहेत...