आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औराळा:बिपखेडा येथे विषारी औषध प्राशन करुन मनसुब कवडे या शेतकऱ्यांची आत्महत्या

औराळा3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • स्वताच्या गायीला बांधलेल्या गोठ्यात विषारी औषध घेऊन खांडेवर पडले.

कन्नड तालुक्यातील बिपखेडा येथील मन्सुब लक्ष्मण कवडे या शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून स्वताच्या गायीच्या गोठ्यात विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना रविवारी दुपारी बाराच्या सुमारास घडली. याबाबत नातेवाईकांनी दिलेली माहिती अशी किं, मन्सुब कवडे यांच्या वर सरकारी बँकेचे व खाजगी पतसंस्थेचे, विविध कार्यकारी सोसायटीचे मोठ्या प्रमाणात कर्ज होते. त्या सर्व कर्जाची उलटपालट करायची असल्याने गेल्या काही दिवसांपासून ते त्याच विवेचनात होते. रविवारी सकाळी पत्नीला गायीला गवत आणायला शेतात पाठवले. व स्वताच्या गायीला बांधलेल्या गोठ्यात विषारी औषध घेऊन खांडेवर पडले.

पत्नी गवत घेऊन गोठ्यात गेल्यावर त्यांना पती मन्सुब कवडे मृतअवस्थेत दिसले. त्यांनी आरडाओरड केली परंतु तोपर्यंत त्यांची जीवनज्योत माळवली होती. औराळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह पाठण्यात आला. वैद्यकीय अधिकारी डॉ प्रदिप कांबळे यांनी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. साडे पाच वाजेच्या सुमारास त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पच्छात पती, दोन मुले, सुन, नातवंडे असा परिवार आहे. कन्नड ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मुत्युची नोद करण्यात आली असुन पुढील तपास पोलीस करत आहे.

...तर मन्सुब वाचला होता असता.
आतापर्यंत कधीच मला फोन न करणारा त्याने आज सकाळी चक्क माझ्या कडुन फोन नंबर घेतला तुला अर्धा, एक तासाने माझा किव्हा नातेवाईकांचा फोन येईल असे सांगितले. आणि एक तासानंतर फोन आला. पण मुलाजवळ फोन जवळ नसल्याने त्यांनी फोन उचला नाही. परत लावायचा पण दुदैवाने माझ्या फोनमध्ये बँलेस नसल्याने फोन लागला नाही. जर माझा संपर्क झाला असता तर मन्सुब नक्की वाचला असता असे रविद्र कवडे बोलताना सागत होते.

बातम्या आणखी आहेत...