आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रकरणाचा उलगडा:मनसुख हिरेन संशयास्पद मृत्यूप्रकरणी सचिन वाझे मुख्य आरोपी, एका बडतर्फ पोलिसासह दोन जणांना अटक

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • एटीएस पोलिस फोर्समधील सहकाऱ्यांना सॅल्यूट

अँटिलिया प्रकरणातील मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणाचा उलगडा केल्याचा दावा महाराष्ट्र दहशतवाद प्रतिबंधक पोलिस पथकाचे महासंचालक (एटीएस) शिवदीप लांडे यांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये केला आहे. या प्रकरणी मुख्य आरोपी सचिन वाझे हाच आहे, असे एटीएस अधिकाऱ्याने सांगितले. हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपासही केंद्रीय तपास संस्था एनआयएकडे देण्यात आला असून तपासाची सूत्रे प्रत्यक्ष घेण्यापूर्वीच एटीएसने हा दावा केला आहे. दरम्यान, एटीएसने शनिवारी रात्री एका बडतर्फ पोलिसासह दोन जणांना अटक केली आहे.

शनिवारी एटीएसने बडतर्फ पोलिस कर्मचारी विनायक शिंदे आणि एक सटोडिया नरेश गौर यांना अटक केली. त्यांची एटीएसच्या मुख्यालयात चौकशी करण्यात आली. शिंदे हा लखनभय्या एन्काउंटर खटल्यातील आरोपी असून गतवर्षी तो फर्लोवर तुरुंगातून बाहेर आला आहे. गौर याच्याकडून मोबाइलची ५ सीमकार्ड््स हस्तगत करण्यात आली. ही सीमकार्ड््स वाझे आणि शिंदे यांनी वापरली होती. सन २००६ मध्ये वर्सोवा येथील बनावट चकमकीदरम्यान रामनारायण गुप्ता ऊर्फ लखनभय्या याचे एन्काउंटर केल्याचा आरोप शिंदेवर असून त्याला बडतर्फ करण्यात आले आहे. शिंदे हा वाझेच्या संपर्कात होता.

शिंदे यानेच ‘तावडे साहेब’ असे बनावट नाव सांगून कांदिवली येथून हिरेन यांना फोन केला होता. ४ मार्च रोजी हिरेन यांनी घरून निघण्यापूर्वी तावडे साहेबांनी मला कांदिवली येथे चौकशीसाठी बोलावले असे कुटुंबीयांना सांगितले होते. रात्री ११ वाजता हिरेन यांची पत्नी व मुलाने फोन केला असता त्यांचा फोन स्वीच ऑफ आला होता, असे एटीएसच्या अधिकाऱ्याने सांगितले.

बातम्या आणखी आहेत...