आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Maratha Arakshan : Sakal Maratha Samaj, Kranti Morcha's Statewide Agitation; Protesters Try To Stop Milk Supply To Mumbai In Kolhapur

मराठा आरक्षण:सकल मराठा समाज, क्रांती मोर्चाचे राज्यभरात आंदोलन; कोल्हापुरात मुंबईचा दूधपुरवठा रोखण्याचा आंदोलकांचा प्रयत्न

मुंबई/ कोल्हापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • औरंगाबादेत मराठा क्रांती ठोक मोर्चाचे आंदोलन

सकल मराठा समाजाच्या वतीने गुरुवारी राज्यात सर्वत्र मराठा आरक्षणासाठी आंदोलन करण्यात आले. कोल्हापुरात गोकुळ दूध संघासमोर आंदोलनकर्त्यांनी मुंबईला होणारा दूधपुरवठा रोखण्याचा प्रयत्न केला. या वेळी काही आंदोलनकर्त्यांची पोलिसांशी झटापटही झाली. नंतर आंदोलनकर्त्यांनी गेटवर ठिय्या मांडला.

औरंगाबादेत मराठा क्रांती ठोक मोर्चाचे आंदोलन

मराठा आरक्षणाला मिळालेली स्थगिती तत्काळ उठवण्यासाठी राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल करावा, अशी मागणी मराठा क्रांती ठोक मोर्चाने औरंगाबादेत केली. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि महाराष्ट्राचे रोहयोमंत्री संदिपान भुमरे यांच्या बंगल्यासमोर ढोल बजाव आंदोलन करण्यात आले.

राज्यात पुणे, सांगली शहरांतही विविध संघटनांनी निदर्शने केली. तर मराठवाड्यात विविध शहरांत आंदोलने करण्यात आली.