आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Maratha Reservation News And Update; ‘The State Government Properly Defended Itself In Court Today’; Information Of Ashok Chavan

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मराठा आरक्षण:'राज्य सरकारने आज न्यायालयात योग्यरित्या बाजू मांडली'; अशोक चव्हाण यांची माहिती

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्य सरकारच्या दिरंगाईमुळे मराठा आरक्षणाला दिलेली स्थगिती उठवण्यात अपयश आल्याचा आरोप होत आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री आणि मराठी उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रीया दिली आहे. चव्हाण म्हणाले की, 'राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी झालेल्या सुनावणी वेळी योग्यरीत्या बाजू मांडली. तसेच, न्यायालयाने राज्य सरकारची मागणी मान्य केली आहे.

एका वृत्त वाहिनीशी बातचीत दरम्यान अशोक चव्हाण म्हणाले की, 'राज्य सरकारने आज न्यायालयात योग्यरीत्या बाजू मांडली. तसेच, हे प्रकरण पाच सदस्यीय घटनापीठाकडे सोपवण्याची राज्य सरकारची मागणी न्यायालयाने मान्य केली आहे. आता या घटना पीठासमोर आपल्याला बाजू मांडावी लागेल. मराठा आरक्षणावरील स्थगिती उठली पाहिजे, असेही सरकारलाही वाटते. परंतु, आपल्या हातात काही नाही. मराठा समाजाने आक्रमक होता कामा नये. न्यायालयीन लढाई ही रस्त्यावर लढून चालणार नाही. आपल्याला घटना पीठासमोरच आपली बाजू मांडली पाहिजे', असे अशोक चव्हाण म्हणाले.

मराठा आरक्षण सुनावणी चार आठवड्यांसाठी पुढे ढकलली

मराठा आरक्षणाप्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी पार पडली. मराठा आरक्षणावरील सुनावणी चार आठवड्यांसाठी पुढे ढकलली आहे. न्यायमूर्ती एल.एन.राव यांच्या खंडपीठासमोर आज ही सुनावणी झाली. दरम्यान सुरुवातीला खंडपीठाने ही सुनावणी काही काळासाठी तहकूब केली होती. यानंतर पुन्हा सुनावणी झाली. यावेळी कोर्टाने ही सुनावणी 4 आठवडे पुढे ढकलली आहे. याचिकाकर्त्यांनी यादरम्यान घटनापीठाकडे आपले म्हणणे मांडावे असे कोर्टाने नमूद केले आहे.