आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

मराठा आरक्षण:'देवेंद्र फडणवीस यांचं काय चुकलं ? आज त्यांचं नाव पाटील, जाधव असतं तर कुणीच काही बोललं नसतं'- उदयनराजे

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात मराठा समाजाच्या आरक्षणावरुन राजकारण चांगलेच तापले आहे. न्यायलायने आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर आरोप प्रत्यारोपांचे सत्र सुरू झाले. यादरम्यान, विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझी जात ब्राह्मण असल्यानेच मला टीकेचा धनी केले जाते, असे म्हटले होते. त्या पार्श्वभूमीवर खासदार उदयनराजे यांनी आपले मत व्यक्त केले आहे.

माध्यमांशी बातचीतदरम्यान उदयनराजे म्हणाले की, 'देवेंद्र माझे चांगले मित्र आहेत. मराठा आरक्षण प्रकरणाचा जातीशी काहीच संबंध नाही. देवेंद्र फडणवीस यांचं काय चुकलं? आज त्यांचं नाव पाटील, जाधव असतं तर कुणीच काही बोललं नसतं. या प्रकरणामध्ये ब्राम्हणांचा काहीच संबंध नाही,' असे मत त्यांनी व्यक्त केले.

काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस ?

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या मराठा आरक्षणाला स्थगितीच्या निर्णयावर आत्मचिंतन करण्याची गरज असल्याचे मत विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. एका वृत्त वाहिणीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान फडणवीस म्हणाले होते, 'आरक्षणाबद्दल मी बेजबाबदार वक्तव्य करणार नाही. सत्ताधाऱ्यांनी समाजाच्या मनात संभ्रम निर्माण करू नये. काही लोकं फक्त राजकीय स्वार्थासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे खापर केंद्रावर फोडत आहेत. राज्याचा कायदा असल्याने केंद्राचा संबंध नाही, असे फडणवीस म्हणाले. याशिवाय फडणवीसांनी त्यांच्यावर होत असलेल्या वयक्तित टीकेवर बोलताना म्हणाले की, 'माझी जात ब्राह्मण असल्यामुळे मला टीकेचा धनी केले जात आहे. पण, मराठा समाजाला माहित आहे की, त्यांच्यासाठी मी कीती केले आहे.'