आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Maratha Reservation News And Updates; The Supreme Court Will Hold A Direct Hearing On Maratha Reservation From March 8;

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मराठा आरक्षण:सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणावर 8 मार्चपासून प्रत्यक्ष सुनावणी;केंद्र सरकारही मांडणार बाजू

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आज पाचच न्यायमूर्तींच्या बेंचसमोर सुनावणी पार पडली

आज सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाप्रकरणी पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर सुनावणी पार पडली. यात पुढील सुनावणीची तारीख दिली असून, या प्रकरणाची पुढील सुनावणी 8 मार्च ते 18 मार्चदरम्यान होणार आहे. राज्य सरकारला युक्तिवादासाठी 4 दिवसांचा वेळ देण्यात आला आहे, तर विरोधी याचिकाकर्त्यांना 3 दिवसांचा वेळ देण्यात येणार आहे. यात केंद्र सरकारही आपली बाजू मांडणार आहे.

न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या अध्यक्षतेखाली न्यायमूर्ती नागेश्‍वर राव, न्यायमूर्ती हेमंत गुप्ता, न्यायमूर्ती रवींद्र भट तसंच न्यायमूर्ती अब्दुल नजीर यांचा समावेश असलेले घटनापीठापुढे आज मराठा आरक्षणाची सुनावणी झाली. मराठा आरक्षणाची सुनावणी ही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून घेऊ नये. जी सुनावणी होणार आहे ती समोरासमोर व्हावी अशी मागणी करण्यात आली होती. त्यामुळे न्यायमूर्तींनी या प्रकरणावर पुढील सुनावणी ही 8 मार्च घेण्याचा आदेश दिला आहे. पुढील सुनावणीही सर्व याचिकाकर्त्यांच्या उपस्थितीत समोरासमोर होण्याची शक्यता आहे.

बातम्या आणखी आहेत...