आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Maratha Reservation Protest Rally : If You Have To File A Case, Do It Against Me, Why Against Ordinary Poor Maratha Brothers? Sambhaji Raje

नांदेड मराठा आरक्षण आंदोलन:गुन्हा दाखल करायचाच असेल तर माझ्यावर करा, सामान्य गरीब मराठा बांधवांवर कशाला? संभाजीराजेंचा संतप्त सवाल

नांदेड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शुक्रवारी नांदेडमध्ये निघाला होता मूक मोर्चा

नांदेडमधील मराठा क्रांती मूक आंदोलनवरुन 21 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांच्या या कारवाईनंतर खासदार छत्रपती संभाजीराजे संतापल्याचे पाहायला मिळाले. गुन्हा दाखल करायचाच असेल तर माझ्यावर करा. सामान्य मराठा बांधवांच्यावरच गुन्हे दाखल का? असा सवाल संभाजी छत्रपती यांनी केला आहे.

'गुन्हा दाखल करायचाच असेल तर माझ्यावर करा ! सामान्य गरीब मराठा बांधवांच्यावर का? समाजाच्या प्रश्नांसाठी नांदेड येथे एकत्र आलेल्या मराठा बांधवांवर प्रशासनाने कोविडचे कारण दाखवत गुन्हे दाखल केले आहेत. राजकीय पक्षांना वेगळा न्याय आणि मराठा समाजाला वेगळा न्याय, असे का?' असा सवाल संतप्त झालेल्या संभाजीराजे भोसलेंनी उपस्थित केला आहे.

शुक्रवारी नांदेडमध्ये निघाला होता मूक मोर्चा
शुक्रारी 20 ऑगस्ट रोजी नांदेडमध्ये मराठा क्रांती मूक आंदोलन छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्त्वाखाली पार पडले होते. मराठा समाजाच्या आक्रोश दाखवण्यासाठी हजारोंच्या संख्येने मराठा समाज एका ठिकाणी जमा झाला होता. एकिकडे सर्व राजकीय पक्षांचे सभा, मेळावे, आंदोलन होत होते. दरम्यान कोविड काळात गर्दी जमवल्या प्रकरणी आयोजकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मराठा क्रांती मोर्चा आंदोलकांवर गुन्हा दाखल झाल्याने संभाजी छत्रपती यांनी संताप व्यक्त केला आहे.

बातम्या आणखी आहेत...