आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संभाजी छत्रपतींची रायगडावरुन घोषणा:मी मेलो तरी चालेल पण मराठा समाजाला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही...

रायगड14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मराठा आरक्षणासाठीचा पहिला मोर्चा 16 जूनला निघणार

आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 348 व्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त रायगडावर भव्य आयोजन करण्यात आले होते. यावेळी खासदार संभाजी छत्रपती यांनी मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनाची घोषणा केली आहे. त्यांनी घोषणा केल्यानुसार, 16 जून रोजी मराठा आरक्षणासाठी पहिला मोर्चा काढण्यात येणार आहे.

मी मेलो तरी चालेल...
यावेळी बोलताना खासदार संभाजी छत्रपती म्हणाले की, छत्रपती शाहू महाराजांनी आरक्षण दिले. त्या शाहू महाराजांच्या कोल्हापूरमधील समाधी स्थळावरुन आम्ही आंदोलनाला सुरुवात करणार आहोत. येत्या 16 जून रोजी मराठा आरक्षणासाठीचा मोर्चा काढण्यात येईल, असे ते म्हणाले. तसेच, मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाने रद्द केले आहे. आधीचे आणि आताचे सरकार एकमेकांकडे बोट दाखवत आहे. तुम्ही खेळ सुरू केला आहे, मी खेळ होऊ देणार नाही. मी संयमी आहे, त्याचा मला अभिमान आहे. तुम्ही माझा संयम पाहिलाय, पण आता संयमी राहणार नाही. आता काय होईल ते होईल. मी मेलो तरी चालेल पण मराठा समाजाला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा संभाजी छत्रपतींनी दिला.

दिशाभूल करणारे रक्त आमच्यात नाही
संभाजीराजे पुढे म्हणाले की, 'मी काही राजकारणी नाही आणि राजकारण करणार नाही. मराठा समाजाला वेठीस धरणार नाही आणि धरायचंही नाही. जर काही चुकलं असेल तर दिलगिरी व्यक्त करतो, पण दिशाभूल करणारे रक्त आमच्यात नाही. आपल्याला समाजाला दिशा देण्याचे काम करायचे आहे. शिवाजीराजे यांनी जे समाजासाठी कार्य केले होते, तेच आपल्याला पुढे न्यायचे आहे.

बातम्या आणखी आहेत...