आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामराठा आरक्षणप्रश्नी खासदार-आमदारांना आडवा, त्यासंदर्भात त्यांना जाब विचारा, त्यांच्याकडे बोलण्यासारखे आता काही राहिले नाही. त्यांना मतदारसंघात फिरू देऊ नका. यापूर्वी समाजामुळे आपण लोकप्रतिनिधी आहोत असे सगळ्यांना वाटत असे. मात्र, आता परिस्थिती बदलली आहे. माझ्यामुळे समाज आहे, अशी धारणा झाल्यामुळे जनताच लोकप्रतिनिधींची मस्ती उतरवेल, अशा शब्दांत खा. उदयनराजे भोसले यांनी शुक्रवारी मराठा आरक्षणप्रश्नी प्रतिक्रिया व्यक्त दिली.
खा. उदयनराजे भोसले म्हणाले, मराठा आरक्षणाचा निकाल पाच तारखेला जाहीर करण्यात आला. गायकवाड समितीने मराठा आरक्षणासंदर्भात अहवाल दिला असतानाही सर्वोच्च न्यायालयाने मराठ्यांना आरक्षणाची गरज नाही, असा निकाल दिला. शासन काय करत आहे, असा प्रश्न उपस्थित करत ते पुढे म्हणाले, शासन अद्याप खुलासा का करत नाही? अशोक चव्हाण म्हणतात, संपूर्ण कागदपत्रे आल्यानंतर अभ्यास करून त्यावर प्रतिक्रिया दिली जाईल. मात्र, ते काहीही म्हणत असले तरी मराठा समाजावरील अन्याय खपवून घेतला जाणार नाही, असेही ते म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.