आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Maratha Reservation Updates: MP Sambhaji Raje Should Give Up His Attitude Towards Maratha Reservation Chandrakant Patil; News And Live Updates

आरक्षणाचा वाद:मराठा आरक्षणाबाबत खासदार संभाजीराजेंनी धरसोड वृत्ती सोडावी; भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा निशाणा

सांगली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • संभाजीराजे हे राष्ट्रपती कोट्यातून खासदार असले तरी त्यांना भाजपनेच संधी दिली आहे - पाटील

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सध्या धरसोड वृत्ती सोडून भाजपची मराठा आरक्षणासंदर्भातील बाजू भक्कमपणे राज्यापुढे मांडली पाहिजे, असे मत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त करत तत्कालीन फडणवीस सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात घेतलेली ठाम भूमिका कमकुवत करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करत आहेत, असा गंभीर आरोपही केला. मराठा समाजाला आरक्षण देण्यात देवेंद्र फडणवीस यांची निर्णायक भूमिका होती. मात्र, महाविकास आघाडी सरकारने मराठा समाजाच्या मूलभूत प्रश्‍नाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाच्या विरोधात निकाल दिला आहे.

न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात पुनर्विचार याचिका दाखल करण्यासाठी सध्या चालढकल केली जात आहे. तज्ञांची समिती नेमून व केंद्र सरकारने केवळ दोन दिवसांत पुनर्विचार याचिका दाखल केली आणि मुख्यत्वे मराठा समाजातील मुलांना ज्या सवलती दिल्या जात नाहीत त्या देण्यास नेमकी राज्य सरकारची काय अडचण आहे? असा मुद्दा उपस्थित करून चंद्रकांत पाटील यांनी मॅनेजमेंट कोट्यातून मेरिटद्वारे ६ टक्के, तर ओपनमधून ९ टक्के असे आरक्षण सहजपणे देता येईल. या विद्यार्थ्यांची अतिरिक्त शुल्क भरण्यास राज्य शासनाला कोणताही विरोध होणार नाही, असा दावाही त्यांनी केला.

लोकसभेने १०२ व्या घटनादुरुस्तीनंतर राज्यांना आरक्षण देण्यास अधिकार दिला आहे. फडणवीस यांनी ते स्पष्टही केले आहे. अशा परिस्थितीत मराठा आरक्षणाचे बिल राज्यपालांकडून राष्ट्रपतींकडे पाठवावे लागेल. या प्रक्रियेला सुमारे चार वर्षांचा कालावधी लागू शकतो. या कालावधीत मराठा समाजातील तरुणांना वाऱ्यावर सोडून चालणार नाही.

संभाजीराजे भाजपचेच खासदार
संभाजीराजे हे राष्ट्रपती कोट्यातून खासदार असले तरी त्यांना भाजपनेच संधी दिली आहे. त्यामुळे ते भाजपचेच खासदार आहेत. मात्र, त्यांनी सध्या घेतलेली धरसोड वृत्ती सोडावी आणि मराठा आंदोलनाविषयी एक पक्षाची ठाम भूमिका जनतेसमोर मांडावी. केवळ कोल्हापुरातील लोकप्रतिनिधींना एकत्र आणून राज्याचा हा प्रश्‍न सुटणार नाही, असेही पाटील म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...