आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मराठा आरक्षण:येत्या 3 ऑक्टोबरला पुण्यात 'मराठा विचार मंथन' बैठकीचे आयोजन; विनायक मेटेंचे दोन्ही राजेंना निमंत्रण

सातारा7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठा आरक्षणासंदर्भात 3 ऑक्टोबरला पुण्यात होणाऱ्या मराठा विचार मंथन बैठकीचे निमंत्रण देण्यासाठी शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे आज थेट साताऱ्यात पोहचले होते. यावेळी त्यांनी खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांची भेट घेऊन बैठकीचे निमंत्रण दिले. यावेळी दोन्ही राजेंनी मराठा आरक्षणा संदर्भात विनायक मेटेंसोबत चर्चा केली.

या भेटीनंतर विनायक मेटे म्हणाले, 'मराठा आरक्षणाबाबत समाजात जो संभ्रम निर्माण झाला आहे तो दूर करण्यासाठी आणि आरक्षणाबाबत दिशा ठरवण्यासाठी आमदार शिवेंद्रराजे भोसले आणि खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. तसेच, दोन्ही राजेंना मराठा विचारमंथन बैठकीचे निमंत्रण दिले. दोन्ही राजेंनी बैठकीला उपस्थित राहणार असल्याचे आश्वासन दिले आहे. तसेच, मराठा समाजाला या बैठकीत दिशा देण्याचे काम त्यांनी करावे, असे आवाहन केल्यानंतर दोघांनी ही याबाबत संमती दर्शवल्याची असल्याचेही मेटेंनी सांगितले.

समाजाला आरक्षण मिळणे महत्वाचे- उदयनराजे

या भेटीनंतर उदयनराजे म्हणाले की, 'मराठा समाजाने कधीच कुणाचे आरक्षण मागितले नाही. स्वतःच्या हक्काच्या आरक्षणाची मागणी केली आहे. 3 ऑक्टोबरला होणाऱ्या बैठकीसाठी मी स्वतः उपस्थित राहणार आहे. नेतृत्व कुणी करावे हे महत्वाचे नाही, तर मराठा समाजाला आरक्षण मिळणे हे महत्वाचे आहे.'

सर्वांनी एकत्र येऊन सरकारवर दबाव आणायला हवा- शिवेंद्रराजे

'मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर राज्यातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे. यासाठी सर्वांनी एकत्र येऊन सरकारवर दबाव आणायला हवा. यासाठी संघटित लढा देण्याचे काम येत्या 3 ऑक्टोबरला पुण्यामधील बैठकीत होणार आहे. या बैठकीला मी स्वतः उपस्थित राहणार असून जो निर्णय समाज घेईल त्या निर्णयाबरोबर मी असेन,' अशी माहिती यावेळी शिवेंद्रराजे यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...