आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हाथरस प्रकरण:मराठी पत्रकार 'चाय-बिस्कुट' खातील, पण प्रामाणिकपणा विकणार नाहीत- रोहित पवार

मुंबई7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये घडलेल्या सामूहीक बलात्काराप्रकरणी बेजबाबदारपमे वार्तांकन करणाऱ्या काही माध्यमांना राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी चांगलंच धारेवर धरलं. तसेच, 'माझे मराठी पत्रकार ‘चाय-बिस्कुट’ खातील, पण प्रामाणिकपणा विकणार नाहीत', असे मते रोहित पवारांनी व्यक्त केले.

आमदार रोहित पवार यांनी अर्णब गोस्वामीचा एक व्हिडीओ ट्विटरवर पोस्ट करत लिहीले की, 'हाथरसमध्ये पीडितेच्या कुटूंबाला गुन्हेगारासारखी वागणूक दिली जात आहे, त्यांचे फोन हिसकावून घेतले गेले आहेत, त्यांना घरात डांबून ठेवले जात आहे आणि संपूर्ण गावाला पोलिसांनी छावनीचे स्वरुप दिले आहे. खासदारांना मारले जात आहे आणि मीडिया कर्मचाऱ्यांचे फोन टॅप करून दिशाभूल करणारे ऑडिओ व्हायरल केले जात आहेत. तुम्हीच पाहा हा निर्लज्जपणा...'

तसेच, रोहित पवारांनी दुसार एक व्हिडिओ पोस्ट केला. यात अर्णब गोस्वामीच्या वृत्तवाहिनीचा रिपोर्टर रिपोर्टिंग करताना दिसत आहे. या व्हिडिओसोबत पवारांनी लिहीले की, 'खऱ्या बातम्या दाखवण्याऐवजी खोट्या बातम्या तयार करण्याची नवीन पत्रकारीता सुरू केलीये. तुम्ही सोबतच्या व्हिडीओत पाहू शकता. याला पत्रकारितेऐवजी सर्कस म्हणणेच अधिक योग्य ठरेल. यापेक्षा अधिक उत्तम माझे मराठी पत्रकार मित्र आहेत. जे ‘चाय-बिस्कुट’ खाऊन राहतील पण आपला प्रामाणिकपणा कधीही विकणार नाहीत', असे मत त्यांनी व्यक्त केले.

बातम्या आणखी आहेत...