आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Marathi News |Amit Shah | Amit Shah On A Two day Tour Of Maharashtra; The First Co operative Conference Will Be Held At Pravara

गृहमंत्री महाराष्ट्र दौऱ्यावर:अमित शहा दोन दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर; प्रवरा येथे घेणार पहिली सहकार परिषद

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. सरकार क्षेत्रांची जबाबदारी स्वीकारल्यानंतर शहा पहिलीच सहकार परिषद घेणार आहेत. या परिषदेसाठी सहकार क्षेत्रातील अनेक जण उपस्थित राहणार आहे. दोन दिवसांच्या या दौऱ्यात अमित शहा अहमदनगर आणि शिर्डीचा दौरा करणार आहेत.

18 डिसेंबर रोजी शहा शिर्डीत साई बाबांचे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर ते सहकार परिषद घेणार आहेत. त्या परिषदेला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे देखील या परिषदेला उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना मात्र राज्यातील सहकार परिषदेचे अद्याप निमंत्रण देण्यात आलेले नाही.

सहकार क्षेत्राची सुरूवात झालेल्या अहमदनगर जिल्ह्यातील प्रवरा येथे देशाची पहिली सहकार परिषद होणार आहे. भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील आणि सुजय विखे यांनी सहकार परिषदेचे आयोजन केले आहे. त्या बैठकीत सहकार क्षेत्रातील तज्ञ मंडळीची उपस्थिती असणार आहेत. अमित शाह या परिषदेत सहकार संदर्भात काही महत्त्वाच्या घोषणा करतात का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बातम्या आणखी आहेत...