आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादक्षिण आफ्रिकेत आढळेल्या कोरोनाने जगभराची चिंता वाढवली आहे. मराठवाड्यात देखील ओमायक्रॉन पसरताना पाहायला मिळत आहे. कारण, मुंबई-पुणे, नागपूर पाठोपाठ आता मराठवाड्यात देखील ओमायक्रॉन दाखल झाला आहे. लातूरमधील औसा तालुक्यात ओमायक्रॉनचा रुग्ण आढळला आहे. तर पुण्यात देखील आणखी एका रुग्णाची भर पडली आहे.
त्यामुळे राज्यातील ओमायक्रॉन रुग्ण संख्या ही आता 20 झाली आहे. आज आढळलेल्या दोन्ही रुग्णांना विलगीकरणात ठेवण्यात आले असून, त्यांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेतला जात आहे. मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूरमध्ये ओमायक्रॉनचे रुग्ण आढळले आहे. तर डोंबिवलीमध्ये आढळलेला पहिला रुग्ण हा ओमायक्रॉनमुक्त झाला आहे.
विदर्भात ओमायक्रॉनचा शिरकाव
विदर्भात ओमायक्रॉनचा शिरकाव झाला असून, रविवारी नागपूरमध्ये ओमायक्रॉनचा रुग्ण आढळून आला आहे. हा रुग्ण आफ्रिकेतून प्रवास करून नागपूरमध्ये परतला होता. तेव्हा या व्यक्तीचा कोरोना चाचणी केली असता त्याचा रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आढळला होता. त्यानंतर जनुकीय चाचणीसाठी त्याचा अहवाल पाठवण्यात आले असता, त्यात ओमायक्रॉन असल्याचे निष्पन्न झाले आहे.
ब्रिटनमध्ये ओमायक्रॉनचा पहिला बळी
ब्रिटनमध्ये कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटने एक जण मृत्यूमुखी पडल्याची माहिती समोर आली आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी या वृत्तास अधिकृत दुजोरा दिला. जगात ओमायक्रॉनमुळे झालेला हा पहिलाच मृत्यू आहे. ब्रिटनच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार या कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंट फैलावण्याचा वेग दर दोन-तीन दिवसांनी दुपटीने वाढत आहे.
ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी एका पत्रकारांशी संवाद साधताना एका व्यक्तीचा ओमायक्रॉनमुळे मृत्यू झाल्याची माहिती सोमवारी दिली. कोरोनाचा ओमायक्रॉन व्हेरिएंट माइल्ड असल्याचे सांगितले जात आहे. हा विचार सध्या बाजूला ठेवण्याची वेळ आली आहे. किती वेगाने लोकांमध्ये कोरोनाचा (ओमायक्रॉन) फैलाव होत आहे ही गोष्ट स्वीकारायला हवी. असेही ते पुढे बोलताना म्हणाले. तर ब्रिटनचे आरोग्य मंत्री साजिद जाविद यांनी सांगितल्याप्रमाणे, युकेमध्ये दर दोन ते तीन दिवसांनी ओमायक्रॉन रुग्णांचा आकडा दुपटीने वाढत आहे. त्यामुळे, लसीचे दोन्ही डोस घेत असतानाच तिसऱ्या बूस्टर डोसवर देखील भर द्यायला हवा.
चीनमध्ये डेल्टा व्हेरिएंटचा नवीन स्ट्रेन
चीनच्या शीजियांगा प्रांतात कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटचा नवीन स्ट्रेन सापडला आहे. 'सब-लीनिएज AY.4' असे या स्ट्रेनचे नाव असून या प्रांतात शीजियांग प्रांतात याचे 138 रुग्ण सापडले आहेत. रुग्णांची वाढती आकडेवारी पाहता पूर्वेकडील लोकांवर प्रवास बंदी लावण्यात आली आहे. कोरोनाची लागण झालेल्या लोकांच्या स्वॅबची जीनोम जीनोम सीक्वेन्सिंग करण्यात आली. यासोबतच, व्हायरस स्टडीमध्ये नवीन स्ट्रेन सब लीनिएज एवाय.4 तीन शहरांमध्ये पोहोचल्याचे दिसून आले. डेल्टा व्हेरिएंटमध्येही नवीन स्ट्रेन सापडल्याची ही पहिलीच वेळ आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.