आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एमआयएमची तिरंगा रॅली:मराठा बांधवांकडून खूप काही शिकण्यासारखे; आपल्यालाही तसेच मैदानात उतरावे लागेल - इम्तियाज जलील

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

मराठा बांधवांकडून खूप शिकण्यासारखे आहे. आरक्षणासाठी काढलेल्या रॅलीमध्ये ते फक्त मराठा म्हणून उतरले. ते कोणत्याही पक्षाचे नव्हते. त्यात ना शिवसेना, भाजप, काँग्रेस ना राष्ट्रवादी काँग्रेस या कोणत्याच पक्षाचे लोक नव्हते. ते फक्त मराठा म्हणून मैदानात उतरले होते. त्यामुळे मराठा बांधवांकडून खूप काही शिकण्यासारखं आहे. आपल्यालाही तसेच मैदानात उतरावे लागेल, असे जलील म्हणाले.

एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांनी मुंबईतील चांदिवली येथील सभेत राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले. मी मुंबईत येऊ नये म्हणून पूर्ण ताकद लावली होती. मात्र मी अखेर मुंबईत आलो. रॅली दरम्यान पोलिसांनी अनेकदा अडवले. औरंगाबादवरून आम्ही 225 गाड्या घेऊन आलो. अनेक ठिकाणी आम्हाला आडवले गेले. औरंगाबाद, अहमदनगर, पुणे पुढे नाही जाऊ देणार, असे त्यांनी सांगितले. पण आम्ही मुंबईत आलोच. मुंबई पोलिस आणि महाराष्ट्र पोलिसांचे आभार, कारण त्यांनी त्यांचे कर्तव्य केले. ते फक्त आदेश मानत होते. त्यात त्यांची काहीच चूक नव्हती, असे इम्तियाज जलील म्हणाले.

मुस्लिम आरक्षण, वक्फ बोर्डाच्या जमिनी आणि इतर मागण्यांसाठी खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्त्वाखाली एमआयएमची तिरंगा रॅली औरंगाबादहून मुंबईत दाखल झाली आहे. आज सकाळपासूनच एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्या मुंबईतील नियोजित सभेची जोरदार चर्चा सुरू आहे. या सभेसाठी ओवेसी मुंबईत दाखल झाले असून, थोड्याच वेळ्यात ते सभा घेणार आहेत. मुंबई जमावबंदीचे आदेश लागू केले असून, सभांना परवानगी नाकारण्यात आल्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटले आहे. मुंबई पोलिसांनी देखील एमआयएमच्या सभेला परवानगी दिलेली नाही. त्यामुळे नेमके मुंबईत आज काय घडणार? याकडे सर्वांचे लक्ष आहे.

दरम्यान, एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी यासंदर्भात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर निशाणा साधला होता. राष्ट्रवादी काँग्रेसला एमआयएम पक्षाकडून धोका असल्यामुळेच ओवेसींच्या मुंबईतील सभेला परवानगी नाकारण्यात आल्याचे ते म्हणाले होते. यासंदर्भात गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना विचारणा केली असता त्यांनी हा दावा फेटाळून लावला आहे. “एखाद्या पक्षाला धोका आहे म्हणून विरोध केला जातो हे म्हणणे बरोबर नाही. पोलिस त्यांचे कर्तव्य बजावत आहेत”, असे ते म्हणाले.

खासदार इम्तियाज जलील काय म्हणाले

ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर मुंबईत रॅली, मोर्चांना बंदी घातल्याचे ऐकले. रॅली, मोर्चाना बंदी घालणे हा एक जोक आहे. सरकार आणि ओमायक्रॉन व्हायरसची काही बोलणी झाली आहे. 11 आणि 12 तारखेला फक्त ओमायक्रॉन येणार आहे. नंतर आम्ही इथून गेलो की तो पुन्हा येईल, असा टोला जलील यांनी लगावला. हा विचित्र प्रकार आहे. पोलिसांची परवानगी मिळाली आहे. कुणी खोडा घालू नये म्हणून परवानगीची माहिती लपवली असल्याचेही ते म्हणाले. ज्या लोकांनी मुस्लिमांचा उपयोग करुन घेतला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी विरोधात असताना मुस्लिम आरक्षणाची मागणी करत होते मात्र आता ते सरकारमध्ये बसून गप्प आहेत. आम्ही आगामी निवडणुका आरक्षणाच्या मुद्द्यावर लढवू, असेही ते म्हणाले. आम्ही डेटासह मुस्लिम समाजावर अन्याय झाल्याचे दाखवून देणार आहोत. अशी प्रतिक्रिया जलील यांनी दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...