आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारणे दाखवा नोटीस पाठवणार:अल्टिमेटम दिल्यानंतरही कर्मचारी गैरहजर; राज्य सरकारकडून एसटी कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई होणार!

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

एसटी कर्मचाऱ्यांना सोमवारपर्यंत सेवेवर रुजू होण्यासाठी अल्टिमेटम देण्यात आला होता, मात्र तरीही अनेक कर्मचारी सेवेवर रुजू झाले नाहीत. त्यामुळे आता राज्य सरकारने कारवाईचा बगडा उचलला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, सेवेवर रुजू न झालेल्या कर्मचाऱ्यांवर आजपासून बडतर्फीची कारवाई सुरू करण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कामावर हजर न राहिल्याने महामंडळाने हे पाऊल उचलल्याचे कळते.

आजपासून बडतर्फीचा निर्णय घेण्यात आला असून, कायमस्वरुपी कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस देण्यास सुरूवात केली आहे. सोमवारपर्यंत कामावरती हजर राहा नाही तर कठोर कारवाईला सामोरे जावा लागणार असल्याचा इशारा परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिला होता. त्यानंतर देखील कामगार कामावर हजर राहिले नाही त्यानंतर राज्य सरकारने कारवाईला सुरूवात केली आहे.

कशी असणार एसटी कर्मचाऱ्यांच्या बडतर्फीची कारवाई?
परिवहन मंत्र्यांनी कर्मचाऱ्यांना सोमवारपर्यंत सेवेवर हजर होण्याचे आदेश दिले होते, त्यानंतर अनेक कर्मचारी कामावर रुजू झाले नाहीत, त्यांना आता कारणे दाखवा नोटीस आजपासून महामंडळाच्या वतीने बजावण्यात आली आहे. या कारणे दाखवा नोटीसीला उत्तर देण्यासाठी सात किंवा पंधरा दिवसांचा कालावधी दिला जाणार आहे. कारणे दाखवे नोटीशीनंतर तीन सुनावणी होतात, त्यात जर दोषी आढळले तर बडतर्फीची नोटीस पाठवण्यात येणार आहे. या नोटीशीला उत्तर देण्यासाठी पुन्हा सात दिवसांचा कालावधी दिला जाणार आहे. त्यानंतर बडतर्फीची कारवाई केली जाईल.

दरम्यान, 8 नोव्हेंबरला राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संपाची हाक दिली होती. एसटी महामंडळाचे विलीनीकरण आणि वेतनवाढ या दोन प्रमुख मागण्या होत्या. राज्य सरकारने वेतनवाढ केले असले तरी विलीनीकरण करा ही प्रमुख मागणी कर्मचाऱ्यांनी लावून धरली. अनेक दिवसांपासून लाल परी ठप्प झाल्याने प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय उडाली आहे.

बातम्या आणखी आहेत...